Lokmat Agro >बाजारहाट > हिरव्या मिरचीचा शेतकऱ्यांनाच ठसका; प्रत्यक्ष बाजार आणि विक्रीच्या दरात मोठा फरक

हिरव्या मिरचीचा शेतकऱ्यांनाच ठसका; प्रत्यक्ष बाजार आणि विक्रीच्या दरात मोठा फरक

Green chillies hit farmers hard; big difference between actual market and selling price | हिरव्या मिरचीचा शेतकऱ्यांनाच ठसका; प्रत्यक्ष बाजार आणि विक्रीच्या दरात मोठा फरक

हिरव्या मिरचीचा शेतकऱ्यांनाच ठसका; प्रत्यक्ष बाजार आणि विक्रीच्या दरात मोठा फरक

mirchi bajar bhav रब्बी हंगामात मिरची लागवड करण्यात येत असली तरी खरीप हंगामात परजिल्ह्यांतील मिरचीवरच अवलंबून राहावे लागते. घाऊक बाजारात मिरचीची आवक वाढली आहे.

mirchi bajar bhav रब्बी हंगामात मिरची लागवड करण्यात येत असली तरी खरीप हंगामात परजिल्ह्यांतील मिरचीवरच अवलंबून राहावे लागते. घाऊक बाजारात मिरचीची आवक वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रब्बी हंगामात मिरची लागवड करण्यात येत असली तरी खरीप हंगामात परजिल्ह्यांतील मिरचीवरच अवलंबून राहावे लागते. घाऊक बाजारात मिरचीची आवक वाढली आहे; परंतु शेतकऱ्यांना विक्री करताना ५० ते ६० रुपयेच दर मिळत आहे.

प्रत्यक्ष बाजारात ग्राहकांना १२० रुपये किलो दराने विकण्यात येत आहे. यामुळे शेतकरी व ग्राहक यांना आर्थिक झळ बसत असून, व्यापारी मालामाल होत आहेत.

घाऊक मार्केटमध्ये ५० ते ६० रुपये किलो दराने मिरची विक्री सुरू आहे. परंतु, जिल्ह्यात दामदुप्पट दराने विक्री केली जात आहे. वाहतूक, इंधन खर्च, हमाली खर्च वगळला तरी विक्रेत्यांना अधिक पैसे मिळत आहेत.

दरवाढीचा फटका ग्राहकांना बसत आहे. बाजारात कमी तिखट व जास्त तिखट अशा दोन प्रकारच्या मिरची उपलब्ध असून, ३० रुपये पाव किलो दराने विक्री सुरू आहे.

आवक वाढल्यामुळे दरात घसरण होणे अपेक्षित असताना दर तेजीत आहेत, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा आहे.

सुरुवातीला दर चांगला, आवक वाढताच कोसळला
गेल्या महिन्यात मिरचीचे दर १४० ते २६० वर पोहोचले होते. मात्र, बाजारातील आवक वाढल्यानंतर दरात घट झाली. सध्या १२० रुपये किलो दराने मिरची विक्री सुरू आहे. बाजारातील दराचा ग्राहकांना फटका बसत आहे.

शेतकऱ्यांना ६० रुपये, ग्राहकांना १२० रुपये दर
शेतकऱ्यांना मिरचीसाठी ६० रुपये दर मिळत आहे, तर प्रत्यक्ष बाजारातील दर १२० रुपये आहे. दर व प्रत्यक्ष विक्रीमध्ये कमालीचा फरक आहे. या तफावतीमध्ये ग्राहक व शेतकरी मात्र होरपळत आहेत.

कशामुळे मिरचीचा भाव उतरला?
पावसामुळे मिरचीचे उत्पादन चांगले असल्यामुळे आवक वाढली. शिवाय पावसाळी वातावरणात मिरची जास्त टिकत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात मिरचीची विक्री केली. परिणामी, घाऊक बाजारातील मिरचीच्या दरात कमालीची घसरण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. जाग्यावर दर कमी असले तरी प्रत्यक्ष विक्रीचे दर जास्त आहेत.

उत्पादनासह तोडणीचाही खर्च परवडेना
मिरची लागवड, खत व्यवस्थापन, तोडणी, बाजारात पाठवेपर्यंत होणारा एकूण खर्च व प्रत्यक्ष लिलावात मिळाणारा दर परवडत नाही. परिणामी, विक्री करावी लागत आहे. मिरची नाशवंत असल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने मिरचीची विक्री करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते विस्कटत आहेत.

अधिक वाचा: ऊस पिकात खोड कीड आली 'हे' कसे ओळखावे? कसा करावा बंदोबस्त? वाचा सविस्तर

Web Title: Green chillies hit farmers hard; big difference between actual market and selling price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.