चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बटाटा, लसूण आणि हिरव्या मिरचीचे भाव तेजीत राहिले.
नवरात्र उत्सवामुळे रताळ्याची ३० टन आवक होऊन उच्चांकी नोंद झाली. मात्र, पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने त्यांचे भाव कोसळले. बाजारातील एकूण उलाढाल ४ कोटी १० लाख रुपये झाली.
कांद्याची एकूण आवक ७५० क्विंटल झाली, यामुळे कांद्याचा कमाल भाव १,५०० रुपयांवरून १,३०० रुपये, मध्यम भाव १,००० रुपये आणि किमान भाव ८०० रुपये झाला.
बटाट्याची आवक २,००० क्विंटल स्थिर राहिली; परंतु भावात २०० रुपयांची वाढ झाली. कमाल भाव १,८०० रुपयांवरून २,००० रुपये, मध्यम भाव १,६०० रुपये आणि किमान भाव १,२०० रुपये नोंदवला गेला.
रताळ्याला मागणी
नवरात्र उत्सवामुळे रताळ्याची मागणी वाढली असून, १४५ क्विंटल आवक झाली. रताळ्याचा भाव २,००० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल राहिला. आडतदार भानुदास बुटे, रवींद्र बोराटे आणि धनंजय बोराटे यांनी रताळ्याला मोठी मागणी असल्याचे सांगितले.
लसूण आणि हिरवी मिरची आवक
लसणाची आवक ४० क्विंटल झाली असून, कमाल भाव ८,००० रुपये मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ३७७ क्विंटल होती, भाव २,५०० ते ३,५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला.
अधिक वाचा: दुधाच्या ४ पट कॅल्शियम असणारी अन् ३०० विकारांवर मात करणारी 'ही' भाजी खाल्लीय का?