Lokmat Agro >बाजारहाट > Cashew Market : हवामानातील बदलामुळे यंदा काजू उत्पादन संकटात; बाजारात चांगला दर मिळण्याचा अंदाज

Cashew Market : हवामानातील बदलामुळे यंदा काजू उत्पादन संकटात; बाजारात चांगला दर मिळण्याचा अंदाज

Cashew Market : Cashew production in crisis this year due to climate change; Expected to get good prices in the market | Cashew Market : हवामानातील बदलामुळे यंदा काजू उत्पादन संकटात; बाजारात चांगला दर मिळण्याचा अंदाज

Cashew Market : हवामानातील बदलामुळे यंदा काजू उत्पादन संकटात; बाजारात चांगला दर मिळण्याचा अंदाज

Kaju Bajar Bhav हवामानातील प्रतिकूल बदलाचा परिणाम काजू उत्पादनावरही झाला आहे. पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे.

Kaju Bajar Bhav हवामानातील प्रतिकूल बदलाचा परिणाम काजू उत्पादनावरही झाला आहे. पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रत्नागिरी : हवामानातील प्रतिकूल बदलाचा परिणाम काजू उत्पादनावरही झाला आहे. पांढरं सोनं म्हणून जिल्ह्याच्या अर्थार्जनात महत्त्वाचा वाटा असलेले काजू उत्पादन काळवंडले आहे.

गेल्या हंगामात अवघे ४० टक्केच पीक होते. परदेशी काजूची आयातीचे प्रमाण घटल्यामुळे काजूला प्रथमच सर्वोच्च दर मिळाला होता. शेतकऱ्यांना त्यावेळी दर चांगला मिळाल्याने शेतकरी तेजीत राहिले असले तरी प्रक्रियाधारक मात्र संकटात आले आहेत.

गत हंगामात परदेशी काजू उपलब्ध न झाल्याने १७५ ते १८० रुपये किलो दराने काजू खरेदी करावा लागला होता; मात्र आता परदेशी काजू १३० ते १४० रुपये किलो दराने उपलब्ध होत आहे.

किलोमागे ३० ते ३५ रुपयांचे नुकसान होत आहे. काजू प्रक्रियाधारकांनी परदेशी काजू न मिळाल्याने स्थानिक काजू खरेदी केला होता. स्थानिक काजूला दर चांगला मिळाला असला तरी प्रक्रियाधारकांना मात्र फटका बसला आहे.

प्रक्रिया व्यवसायासाठी काजू खरेदी केला असला तरी विक्रीसाठी परदेशी बाजारपेठेत संधी नसल्यामुळे देशांतर्गतच विक्री करावी लागत आहेकाजू.

गतवर्षी काजूला सर्वोच्च दर
गेली काही वर्षे ८० ते १२० रुपये किलो इतकाच काजूला दर मिळाला होता. मात्र, गेल्या हंगामात परदेशी काजूची आयात न झाल्यामुळे स्थानिक काजूला प्रथमच सर्वोच्च दर मिळाला होता. परदेशी काजू कमी दरात मिळत असल्यामुळे प्रक्रिया व्यावसायिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे.

आयात न झाल्याने नुकसान
दरवर्षी प्रक्रिया व्यावसायिक परदेशातून काजू आयात करतात. मात्र, यावर्षी आयात न केल्यामुळे प्रक्रिया व्यावसायिकांना अधिक दर देऊन स्थानिक काजू खरेदी करावा लागल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.

हवामानाचा परिणाम
दरवर्षी हवामानातील बदलाचा परिणाम काजू पिकावर होत असून, उत्पादन खालावत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर्षी उत्पादन कमी असताना शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला, परंतु दरवर्षी चांगले दर मिळत नाहीत.

देशातंर्गत विक्री
सध्या तरी परदेशी मार्केट उपलब्ध होत नसल्यामुळे काजू स्थानिक बाजारात विकावा लागत आहे. निर्यात कमी असल्याने काजूगराला चांगला दर मिळत नसल्याने प्रक्रिया व्यावसायिकांचे नुकसान होत आहे.

एक लाख ११ हजार हेक्टरवर लागवड
फळपिकात जिल्ह्यामध्ये सर्वाधिक काजूची लागवड असून, एकूण एक लाख ११ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर लागवड असून, हेक्टरी उत्पादन क्षमात १.५० टन आहे. परंतु, हवामानातील बदलाचा परिणाम उत्पादकतेवर होत आहे.

अधिक वाचा: Havaman Andaj : आता शेतकऱ्यांचे मिटणार टेन्शन प्रत्येक गावांमध्ये होणार वेदर स्टेशन

Web Title: Cashew Market : Cashew production in crisis this year due to climate change; Expected to get good prices in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.