सांगोला : सांगोला तालुक्यातील ६२१ शेतकऱ्यांनी सांगोला तालुका क्विंटल मक्याची नोंद खरेदी विक्री संघाकडे (फेडरेशन) १५ हजार केली आहे.
येत्या सोमवार, १५ डिसेंबरपर्यंत मक्याची नोंद घेण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात मका खरेदी करण्यात येणार असल्याचे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव यांनी सांगितले.
गेल्या दोन-तीन वर्षापासून सांगोला तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आपसूकच मका लागवड वाढल्याने उत्पादन वाढले आहे. पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यामुळे यंदाही सांगोला तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांकडे मका उत्पादन वाढले असले तरी मक्याला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.
त्यामुळे सरकारकडून फेडरेशनमार्फत २४०० रुपये प्रतिक्विंटलने किमान आधारभूत किमतीने मका खरेदी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
दरम्यान, सांगोला तालुका खरेदी-विक्री संघाला २१ नोव्हेंबर रोजी फेडरेशनला मान्यता मिळाली असून, प्रत्यक्षात २६ नोव्हेंबरपासून मक्याची नोंदणी सुरू झाली आहे.
शुक्रवार, १२ डिसेंबरपर्यंत सांगोला तालुक्यातील ६२१ शेतकऱ्यांनी १५०० एकर क्षेत्रावरील १५ हजार क्विंटल मक्याची फेडरेशनकडे नोंदणी केली आहे.
येत्या सोमवार, १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना मक्याची नोंदणी करता येणार आहे. पुढील आठवड्यापासून प्रत्यक्षात मका खरेदी केली जाणार असून, शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे चेअरमन यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी मका नोंदणीसाठी चालू २०२५-२६ पीक पाणी उतारा आधार कार्ड, फार्मर आयडी, बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात जमा करावीत. - रमेश जाधव चेअरमन, खरेदी-विक्री संघ
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 'या' सात साखर कारखान्यांनी पहिल्या १० दिवसांचे ऊस बिल केले जमा
