Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट; भाववाढीबरोबरच वर्षभर दर टिकून राहणार का? वाचा सविस्तर

यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट; भाववाढीबरोबरच वर्षभर दर टिकून राहणार का? वाचा सविस्तर

Big drop in raisins production this year; Will the prices remain stable throughout the year? Read in detail | यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट; भाववाढीबरोबरच वर्षभर दर टिकून राहणार का? वाचा सविस्तर

यंदा बेदाण्याच्या उत्पादनात मोठी घट; भाववाढीबरोबरच वर्षभर दर टिकून राहणार का? वाचा सविस्तर

यंदा मार्केटिंगचे द्राक्षे ही १ लाख टनावर विक्री झाली आहे. बेदाणा मात्र दीड लाख टन उत्पादित होण्याची शक्यता असतानाही अवघ्या १ लाख मेट्रिक टन उत्पादित झाल्याचा अंदाज आता शेतकरी वर्तवित आहेत.

यंदा मार्केटिंगचे द्राक्षे ही १ लाख टनावर विक्री झाली आहे. बेदाणा मात्र दीड लाख टन उत्पादित होण्याची शक्यता असतानाही अवघ्या १ लाख मेट्रिक टन उत्पादित झाल्याचा अंदाज आता शेतकरी वर्तवित आहेत.

कुर्डूवाडी : जिल्ह्यात यंदा १ लाख मेट्रिक टन बेदाणा निर्मिती झाल्याचा अंदाज आहे. तर, खुल्या बाजारपेठेत १ लाख मेट्रिक टन द्राक्ष शेतकऱ्यांकडून थेट व्यापाऱ्यांनी खरेदी केल्याचेही बागायतदारांकडून सांगण्यात आले.

सध्या बाजारपेठेत उत्कृष्ट क्वालिटीच्या बेदाणाला सरासरी ३३० ते ४०० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळू लागला असल्याने द्राक्ष शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

तर, मार्केटिंगच्या द्राक्षांलाही ६० ते ८० रुपयांचा दर व्यापाऱ्यांकडून मिळत आहे. उत्पादन घटल्याने यंदा भाव आणखी वाढण्याची आशा आहे.

जिल्ह्यात यंदा मार्केटिंगचे द्राक्षे ही १ लाख टनावर विक्री झाली आहे. बेदाणा मात्र दीड लाख टन उत्पादित होण्याची शक्यता असतानाही अवघ्या १ लाख मेट्रिक टन उत्पादित झाल्याचा अंदाज आता शेतकरी वर्तवित आहेत.

जिल्ह्यामध्ये माढा, उत्तर सोलापूर पंढरपूर व बार्शी या तालुक्यांतील बहुतांशी भागात द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा नैसर्गिक आपत्ती आणि खराब हवामानामुळे दरवर्षीपेक्षा उत्पादन कमी निघाले आहे.

जिल्ह्यात ५६ हजार हेक्टर क्षेत्रात द्राक्ष बागा असून, त्यातील ७० टक्के बागेतून बेदाणा निर्मिती करण्यात आली आहे. त्यामधून एक लाख मेट्रिक टन बेदाणा निर्मिती झाला असून, बाकीची द्राक्षे ही मार्केटिंगसाठी विक्री झाली आहे.

त्याबरोबर टेबल ग्रेप्ससाठीही २० हजार हेक्टरवर द्राक्ष बाग असून, त्यातूनही १ लाख मेट्रिक टन मार्केटिंग द्राक्षे व्यापाऱ्यांना विक्री करण्यात आले.

बेदाण्यासाठी खुल्या मार्केटची सोय व्हावी
◼️ बेदाणा विक्रीसाठी विजयपूर, सांगली, तासगाव, सोलापूर, पंढरपूर हे मार्केट उपलब्ध आहेत.
◼️ याव्यतिरिक्त ओपन मार्केटचा विचार व्हावा आणि मोजक्या व्यापाऱ्यांना सोडून अनेक व्यापाऱ्यांनाही खरेदी-विक्री करण्यासाठी शासनाकडून लायसन्स मिळाव्यात.
◼️ यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होईल, असेही द्राक्ष बागायतदारांकडून बोलण्यात येत आहे. सध्या बेदाणा कोल्ड स्टोरेजमध्ये टाकण्याचे काम सुरू आहे.
◼️ तर उर्वरित शेतकऱ्यांकडून एप्रिल छाटणीस सुरुवातदेखील करण्यात आली असून, अंतर्गत मशागतीचेही कामे होत आहेत.

जिल्ह्यात सुमारे १.५० लाख मेट्रिक टन बेदाणा उत्पादित होईल, असा अंदाज होता. परंतु, त्यातही घट होऊन यंदा १ लाख मेट्रिक टनच बेदाणा निर्मिती झाला आहे. कमी उत्पादन निघाल्याने वर्षभर दर उत्कृष्ट राहण्याची शक्यता आहे. - नितीन कापसे, अध्यक्ष, कृषीनिष्ठ परिवार, कापसेवाडी

बेदाण्याचा काळा माल हा १६५ ते २२० रुपये प्रति किलो, तर चांगल्या क्वालिटीचा बेदाणा हा २८० ते ३३० प्रति किलो दराने जात आहे. तर, उत्कृष्ट क्वालिटीचा बेदाणा माल मात्र ३३० ते ४०० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. - जगन गुलचंदकुमार अग्रवाल, व्यापारी, सांगली

अधिक वाचा: सोलापूर बाजार समितीत 'या' शेतकऱ्याचा बेदाणा ठरला किंग; वाचा प्रतिकिलो काय मिळाला दर?

Web Title : सोलापुर में किशमिश उत्पादन में भारी गिरावट; कीमतों में वृद्धि की संभावना।

Web Summary : खराब मौसम के कारण सोलापुर में किशमिश का उत्पादन घटकर 1 लाख मीट्रिक टन हो गया। कीमतें अधिक हैं, उच्चतम गुणवत्ता वाली किशमिश ₹400/kg पर बिक रही है। किसानों को अधिक व्यापारियों के लिए खुले बाजार पहुंच और लाइसेंस की उम्मीद, कीमतों में वृद्धि जारी रहने की संभावना है।

Web Title : Raisin Production Plummets in Solapur; Prices Expected to Remain High.

Web Summary : Solapur raisin production decreased to 1 lakh metric tons due to adverse weather. Prices are high, with top quality raisins fetching ₹400/kg. Farmers seek open market access and licenses for more traders, anticipating sustained high prices.