Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > केळी व्यापारी तुपाशी; शेतकऱ्यांकडून दीड रुपये किलोने खरेदी अन् बाजारात ४० रुपये डझनाने विक्री

केळी व्यापारी तुपाशी; शेतकऱ्यांकडून दीड रुपये किलोने खरेदी अन् बाजारात ४० रुपये डझनाने विक्री

Banana traders get good money; Buy from farmers Rs 1.50 per kg and sell in the market Rs 40 per dozen | केळी व्यापारी तुपाशी; शेतकऱ्यांकडून दीड रुपये किलोने खरेदी अन् बाजारात ४० रुपये डझनाने विक्री

केळी व्यापारी तुपाशी; शेतकऱ्यांकडून दीड रुपये किलोने खरेदी अन् बाजारात ४० रुपये डझनाने विक्री

keli market आखातातील युद्धामुळे केळीचे भाव कमालीचे पडले असून शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी एक ते दीड रुपया किलोने खरेदी करत आहेत.

keli market आखातातील युद्धामुळे केळीचे भाव कमालीचे पडले असून शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी एक ते दीड रुपया किलोने खरेदी करत आहेत.

करमाळा : आखातातील युद्धामुळेकेळीचे भाव कमालीचे पडले असून शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी एक ते दीड रुपया किलोने खरेदी करत आहेत.

बाजारात मात्र विक्रेते डझनाला ४० ते ५० रुपये मोजत असल्याने चित्र दिसत असल्याने ग्राहकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

अमेरिका व इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्त्राने हल्ला चढविल्याने सध्या आखाती देशात युद्ध भडकले आहे.

याचा परिणाम करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला असून गेल्या तीन आठवड्यांपासून केळीचे भात कमालीचे पडलेले आहेत.

युद्धामुळे अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याने आखातात केळीची निर्यात बंद झाली आहे याचा फटका केळी उत्पादकांना बसलेला आहे.

एरवी १७ ते १८ रुपये किलो दराने निर्यात होणारी केळी आता रुपया ते दीड रुपया किलोने शेतकऱ्याकडून व्यापारी खरेदी करू लागला आहे.

शेतकऱ्याकडून कवडीमोल दराने खरेदी केलेली केळी व्यापाऱ्याकडून मात्र ग्राहकांना ४० ते ५० रुपये डझनाने विक्री होताना दिसत आहे.

आखाती देशात युद्ध सुरू असले तरी केळी देशातसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होतात तरीपण युद्धाच्या नावाखाली व्यापारी केळी उत्पादकावर अन्याय करीत आहेत. शेतकऱ्याकडून कमी भावाने घेतलेली केळी बाजारात ग्राहकांना कमी भावात का विक्री करत नाही. - अण्णासाहेब सुपनवर अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्याकडून केळीची खरेदी केल्यानंतर केळी कोल्ड स्टोअरेजमध्ये पिकण्यासाठी ठेवावे लागतात. जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी यामध्ये जातो. त्याकरिता कोल्ड स्टोरेजचे भाडे, विजेचे बिल याकरिता खर्च येतो. त्यामुळे दर वाढवून केळी विकावी लागतात. - नाजिम बागवान केळी विक्रेता

अधिक वाचा: Maharashtra Rain Alert: हवामान बदलणार; राज्यात आजपासून पुन्हा गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Web Title : युद्ध के बीच किसानों को नुकसान, केला व्यापारियों को मुनाफा

Web Summary : खाड़ी में युद्ध के कारण किसानों के लिए केले की कीमतें घटकर ₹1.5/kg हो गईं। व्यापारी सस्ते में खरीदते हैं, ₹40/दर्जन पर बेचते हैं, जिससे उपभोक्ताओं में आक्रोश है। निर्यात रुका, करमाला के किसान प्रभावित। खुदरा मूल्यों के लिए कोल्ड स्टोरेज लागत का हवाला दिया गया।

Web Title : Banana Traders Profit Amidst Farmer Losses Due to War

Web Summary : War in the Gulf has slashed banana prices for farmers to ₹1.5/kg. Traders buy cheap, selling at ₹40/dozen, sparking consumer outrage. Exports halted, impacting Karmla farmers. Cold storage costs cited for high retail prices.