पुणे : यंदाचा लांबलेला मॉन्सून आणि परतीच्या पावसाचा वाढलेला मुक्काम यामुळे विविध फळबागांना फटका बसला आहे.
यामध्ये नागपूर संत्र्याचा हंगामाला फटका बसला असून, पावसाने संत्र्यांची फळगळ आणि माशीच्या प्रादुर्भावामुळे ५० टक्के नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
परिणामी बाजारातील आवक आणि हंगामही लवकर जाण्याची भिती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड येथील फळ बाजारात सध्या ७०० पेट्यांची आवक होत आहे.
यावेळी ८ डझन ते २० डझनच्या पेटीला सुमारे ३०० ते ११०० रूपये दर असल्याची माहिती नागपूर संत्र्यांचे प्रमुख आडतदार करण जाधव यांनी दिली.
हंगाम अडचणीत माशीच्या प्रादुर्भावामुळे
◼️ संत्र्यांचा दर्जा आणि टिकवण क्षमता कमी झाली असून, त्याला दोन दिवसांतच पाणी सुटायला लागले आहे.
◼️ यामुळे तातडीने माल विक्री करावी लागत आहे. तर पाणी सुटत असल्याने खरेदीदार पण कमी खरेदी करत आहे.
◼️ तसेच पावसाने आणि फळांना ऊन न मिळाल्याने फळांमध्ये रंग, गोडी उतरली नसल्याने आंबटपणा वाढला आहे.
असे आहेत दर
डझन - दर (रु.)
९ ते १० - ११००
८ ते ११ - १०००
१२ डझन - ८००
१४ डझन - ७००
२०० नग - ५००
३०० नग - ३००
सततच्या पावसाने फळांची गळ होत असून, माशीचाही प्रादुर्भाव झाल्याने हंगाम अडचणीत आला आहे. यामुळे आवक कमी येत असून, तीन महिने चालणारा हंगाम दीड महिन्यातच संपण्याची भीती आहे. - करण जाधव, संत्री व्यापारी
अधिक वाचा: कर्नाटकातून पांढऱ्या कांद्याच्या बाराशे पिशव्यांची सोलापूर बाजारात आवक; वाचा कसा मिळतोय दर?
