Lokmat Agro >शेतशिवार > जगप्रसिद्ध महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला तयार झालाय नवा स्पर्धक; यंदा केली ८० कोटीची उलाढाल

जगप्रसिद्ध महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला तयार झालाय नवा स्पर्धक; यंदा केली ८० कोटीची उलाढाल

World famous Mahabaleshwar strawberries have a new competitor; this year they have achieved a turnover of 80 crores | जगप्रसिद्ध महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला तयार झालाय नवा स्पर्धक; यंदा केली ८० कोटीची उलाढाल

जगप्रसिद्ध महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला तयार झालाय नवा स्पर्धक; यंदा केली ८० कोटीची उलाढाल

राज्यातील काही जिल्ह्यांना तेथील पीकपद्धती व फळांनी भौगोलिक ओळख प्राप्त करून दिली. 'स्ट्रॉबेरी लँड' म्हणून जगप्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्यापैकीच एक.

राज्यातील काही जिल्ह्यांना तेथील पीकपद्धती व फळांनी भौगोलिक ओळख प्राप्त करून दिली. 'स्ट्रॉबेरी लँड' म्हणून जगप्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्यापैकीच एक.

शेअर :

Join us
Join usNext

सचिन काकडे
सातारा : राज्यातील काही जिल्ह्यांना तेथील पीकपद्धती व फळांनी भौगोलिक ओळख प्राप्त करून दिली. 'स्ट्रॉबेरी लँड' म्हणून जगप्रसिद्ध असलेले महाबळेश्वर त्यापैकीच एक.

मात्र, महाबळेश्वरच नव्हे, तर द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातही स्ट्रॉबेरीची शेती वाढू लागली असून, यंदा महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला याची मोठी आर्थिक झळ बसली आहे.

शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्रॉबेरीकडे पाहिले जाते. महाबळेश्वरचे वातावरण या पिकासाठी पोषक असल्याने ब्रिटिश राजवटीपासून येथे ही शेती केली जात आहे.

आजमितीला तालुक्यात दोन हजार स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी असून, दरवर्षी अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड केली जात आहे.

कमी कालावधीत अधिक नफा मिळत असल्याने आता नाशिक जिल्ह्यातील शेतकरीही स्ट्रॉबेरीकडे वळू लागले आहेत.

सुरगाणा, कळवण, दिंडोरी व पेठ या तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसह शास्त्रशुद्ध पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड करू लागले आहेत.

घाटमाथ्यावरील वातावरण, माती, हवा पोषक असल्याने दहा वर्षांपूर्वी काही शेतकऱ्यांनी महाबळेश्वरमधून रोपे आयात करून प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी लागवड सुरू केली.

प्रयोग यशस्वी झाल्याने आता १ हजार एकर क्षेत्र या पिकाखाली आले आहे. स्ट्रॉबेरीला चांगली बाजारपेठ मिळत असल्याने महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला यंदा तब्बल ४० टक्के फटका बसला आहे.

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी का आहे खास?
-
समुद्रसपाटीपासूनची उंची.
- लाल-तांबडी लोहयुक्त माती, पाणी, हवा पिकासाठी पोषक.
- एका फळावर बाहेरून २०० बिया अन्य ठिकाणी १५०.
- येथील फळांचा रंग लाल तर अन्य ठिकाणचा तपकिरी.
- ब्रिक्स लेव्हल ८ ते १० अन्य ठिकाणी ७ पेक्षा कमी.
- पाण्याचे प्रमाण ८० टक्के अन्य ठिकाणी ५० ते ५५ टक्के.

महाबळेश्वर व नाशिकमधील स्ट्रॉबेरची आकडेवारी

 शेतकरीलागवड क्षेत्रवार्षिक उत्पादन
महाबळेश्वर०२ हजार०३ हजार एकर५० हजार मेट्रिक टन
नाशिक७०० शेतकरी०१ हजार एकर०३ हजार एकर

२५० कोटी वार्षिक उलाढाल
महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची वार्षिक उलाढाल २५० कोटी तर नाशिकची उलाढाल तब्बल ८० कोटी रुपये आहे. नाशिकमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादकांची संख्या वाढू लागल्याने याचा महाबळेश्वरच्या उलाढालीवर परिणाम होत आहे.

महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळेच राज्य शासनाकडून वर्ष २००८ मध्ये स्ट्रॉबेरीला 'जीआय' मानांकन मिळाले. नाशिक जिल्ह्यात व महाबळेश्वरात पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीची रंगसंगती, चव त्यातील गुणधर्म व अन्य घटकांचे प्रमाण यात प्रचंड भिन्नता आढळते. अलीकडच्या काही वर्षांत नाशिकमधील काही तालुक्यांमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादकांची संख्या वाढू लागली असून, याची महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीवर परिणाम होऊ लागला आहे. - किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे, फुले, भाजीपाला संस्था

अधिक वाचा: उसाला १८ महिने सांभाळण्यापेक्षा एका वर्षात या पिकाचे पैसे शेतकऱ्यांच्या हातात; वाचा सविस्तर

Web Title: World famous Mahabaleshwar strawberries have a new competitor; this year they have achieved a turnover of 80 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.