Lokmat Agro >शेतशिवार > जागतिक नारळ दिन विशेष : जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असलेल्या नारळाचे गुणधर्म

जागतिक नारळ दिन विशेष : जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असलेल्या नारळाचे गुणधर्म

World Coconut Day Special: Learn about the properties of coconut, a trinity of health, beauty and culture | जागतिक नारळ दिन विशेष : जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असलेल्या नारळाचे गुणधर्म

जागतिक नारळ दिन विशेष : जाणून घ्या आरोग्य, सौंदर्य आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम असलेल्या नारळाचे गुणधर्म

Health Benefits Of Coconut : आधुनिक जीवनशैलीत शरीराला डिटॉक्स हवे, त्वरित ऊर्जा हवी आणि नैसर्गिक आरोग्यदायी उपाय हवा असल्यास त्याचे उत्तर नारळात दडलेले आहे. नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा समृद्ध स्रोत असून हायड्रेशन थेरपीसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे.

Health Benefits Of Coconut : आधुनिक जीवनशैलीत शरीराला डिटॉक्स हवे, त्वरित ऊर्जा हवी आणि नैसर्गिक आरोग्यदायी उपाय हवा असल्यास त्याचे उत्तर नारळात दडलेले आहे. नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा समृद्ध स्रोत असून हायड्रेशन थेरपीसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे.

शेअर :

Join us
Join usNext

आधुनिक जीवनशैलीत शरीराला डिटॉक्स हवे, त्वरित ऊर्जा हवी आणि नैसर्गिक आरोग्यदायी उपाय हवा असल्यास त्याचे उत्तर नारळात दडलेले आहे. नारळ पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा समृद्ध स्रोत असून हायड्रेशन थेरपीसाठी ते अत्यंत उपयुक्त आहे. डिहायड्रेशनच्या वेळी दिल्यास ते शरीरातील द्रव संतुलन लवकर पुनर्संचयित करते आणि त्वरित ऊर्जा देते.

तज्ज्ञांच्या मते, नारळ तेलात असलेले मल्टिचेन लांग फॅटी ॲसिड्स बाळाच्या वजनवाढीसोबतच मेंदूच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे गर्भवती व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी नारळाचे सेवन विशेष उपयुक्त ठरते. नारळ पाणी व गरामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक आणि सेलेनियमसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ही खनिजे हाडांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, रक्ताभिसरण आणि चयापचय प्रक्रियांसाठी महत्त्वात्ची मानली जातात.

दरवर्षी २ सप्टेंबरला जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे नारळ उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारणे आणि जनतेमध्ये नारळाच्या आरोग्यदायी गुणधर्माबाबत जागरूकता निर्माण करणे. कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाणारा नारळ ग्रामीण अर्थव्यवस्था, आयुर्वेद आणि आहारशास्त्रात तितकाच महत्त्वाचा मानला जातो.

आरोग्यदायी फायदे

पचनक्रिया सुधारते व शरीरातील द्रव संतुलन राखते, मूत्रमार्गाच्या तक्रारी टाळते, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत, त्वचेचा व केसांचा नैसर्गिक पोषण करणारे, त्वरित ऊर्जा देऊन थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

नारळ पाणी हे हायड्रेशन थेरपीमध्ये अतिशय उपयुक्त आहे. त्यातील पोटॅशियम शरीराला ताकद देतो. तसेच नारळ तेल बाळाचे वजन वाढविण्यासोबतच मेंदूच्या विकासासाठी प्रभावी ठरते. - डॉ. एस. आर. पबीतवार, त्वचारोग तज्ज्ञ, बुलढाणा.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

Web Title: World Coconut Day Special: Learn about the properties of coconut, a trinity of health, beauty and culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.