Lokmat Agro >शेतशिवार > उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी काय करावे? व काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी काय करावे? व काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

What to do to protect yourself from heat waves? and what not to do? Find out in detail | उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी काय करावे? व काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी काय करावे? व काय करू नये? जाणून घ्या सविस्तर

Heat Wave राज्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उ‌द्भवण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Heat Wave राज्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उ‌द्भवण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Heat Wave राज्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट उ‌द्भवण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

नागरिकांनी उष्णतेच्या लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कार्यालयाने केले आहे.

वाढत्या उष्म्यामुळे सर्दी, तापसरीचे रुग्ण वाढत असल्याची माहिती पुढे येत आहे. वाढत्या उष्म्याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने त्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उन्हाळा वाढतोय, आता काय कराल?
- दर अर्ध्या तासाने पाणी प्या. घराबाहेर पडताना छत्री अथवा टोपी वापरा.
- सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
- उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा.
- हलके पातळ सुती कपडे वापरा.
- प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवा.
- उन्हात काम करताना टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाका.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक आदी प्या.
- अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा धाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखा.
- चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जनावरांना छावणीत ठेवा. त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्या.
- घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करा.
- रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
- पंखे, ओले कपडे याचा वापर करा.
- थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करा.
- कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
- पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करा.
- बाहेर काम करत असल्यास मध्ये विश्रांती घ्यावी.
- गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घ्या.

काय करू नये
- उन्हात अति कष्टाची कामे करू नका.
- मादक पेय, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.
- दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
- उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका.
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
- गडद घट्ट व जाड कपडे घालणे टाळा.
- उन्हाच्च्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळा.
- स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघड्या ठेवा.

अधिक वाचा: माठातील पाणी कसे थंड होते? व त्याचा आरोग्यासाठी कसा फायदा होतो? जाणून घ्या सविस्तर

Web Title: What to do to protect yourself from heat waves? and what not to do? Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.