सध्या तापमान वाढले असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळा प्रयत्न केला जात आहे. त्यात शरीरात गारवा मिळावा, यासाठी ताडगोळे खरेदीवर अधिक भर दिला जात आहे.
त्यामुळे ताडगोळ्याला प्रचंड मागणी वाढली आहे. त्यामुळे मानवी आरोग्यासाठी ताडगोळ्याचा आधार मिळत आहे. सध्या १०० रुपयांना सहा ते आठ ताडगोळ्यांची विक्री सुरू आहे.
उन्हाच्या चटक्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी काही जण मफलर, स्कार्पचा वापर करीत आहेत. काही जण गॉगल, टोपी तर काही जण सावलीचा आधार घेत आहेत.
या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची भीती आहे. त्यामुळे उन्हाच्या या कालावधीत ताडगोळे शरीरासाठी खूप उपयुक्त ठरत आहेत.
आरोग्यासाठी गुणकारी असलेले ताडगोळे विक्रीला बाजारात सुरुवात झाली आहे. चवदार आणि निसर्गतः थंड असलेल्या या ताडगोळ्यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते.
त्यात मोठ्या प्रमाणावर पोषकतत्त्व आणि पाणी असून, ताडगोळ्यांच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते. खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व ताडगोळ्यांमध्ये आढळतात.
त्यामुळे थंडावा देणाऱ्या या फळांना उन्हाळ्यात मागणी वाढू लागली आहे. ताडगोळ्याचे अनेक फायदे असल्याने पर्यटक आणि नागरिकही याकडे आकर्षित होत आहेत.
उष्णता वाढल्यामुळे ताडगोळ्यांना मागणी वाढली आहे. खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन ए, बी, सी हे जीवनसत्त्व ताडगोळ्यांमध्ये आढळतात. ताडगोळे खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
कुठे मिळतात ताडगोळे?
◼️ कर्जतमधील नागरिकांना आणि पर्यटकांना मोहून टाकणारा रानमेवा म्हणजे ताडगोळे आहे.
◼️ कोकण किनारपट्टीवर नारळी पोफळीप्रमाणेच ताडाची झाडेही मोठ्या प्रमाणावर आहेत.
◼️ रायगड जिल्ह्यातील अलिबाग चौल, रेवदंडा, किहीम परिसरात ही झाडे पहायला मिळतात.
◼️ या फळातील गर पाणीदार आणि चवदार असतो. त्यामुळे तो सर्वांच्या पसंतीस उतरतो.
◼️ कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी ताडगोळे विक्रीसाठी विक्रेते आले असून नागरिकही खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहेत.
अधिक वाचा: जिल्हा मध्यवर्ती बँकांना केंद्र सरकारचा मोठा झटका; आता 'त्या' संचालकांना कायमचे घरी बसावे लागणार
