Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील 'या' जिल्ह्यांना मिळणार ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत

राज्यातील 'या' जिल्ह्यांना मिळणार ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत

These districts of the state will soon receive assistance for the damage caused by heavy rains in August and September | राज्यातील 'या' जिल्ह्यांना मिळणार ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत

राज्यातील 'या' जिल्ह्यांना मिळणार ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत

pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

pik nuksan bharpai ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

शेअर :

Join us
Join usNext

ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरु आहेत, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.

राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर (४२ लाख ८४ हजार ८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.

यात प्रामुख्याने खरीप शेतपिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे.

सर्वाधिक बाधित जिल्हे
नांदेड - ७,२८,०४९ हेक्टर
यवतमाळ - ३,१८,८६० हेक्टर
वाशीम - २,०३,०९८ हेक्टर
अकोला - १,७७,४६६ हेक्टर
धाराशिव - १,५७,६१० हेक्टर
बुलढाणा - ८९,७८२ हेक्टर
सोलापूर - ४७,२६६ हेक्टर

बाधित पिके
सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

बाधित जिल्हे
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे.

अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील नावे कायदेशीररीत्या कमी करायचीत? कशी कराल? वाचा सविस्तर

Web Title: These districts of the state will soon receive assistance for the damage caused by heavy rains in August and September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.