अनेक वनस्पती पावसाळ्यात उगवतात त्यातील अनेक वनस्पती या खाण्यास योग्य असतात. विशेषतः आदिवासींनी या शोधून काढल्या आहेत. अनेक पिढ्यांपासून त्या जपल्याही आहेत.
अरण्यऋषी दिवंगत मारुती चित्तमपल्ली यांच्या 'केशराचा पाऊस' या पुस्तकातील 'जंगलातील वनस्पती शास्त्रज्ञ' या लेखात अस्वलांचा वावर ओळखताना अळंबीचा उल्लेख येतो.
पावसाळ्यात विपुल प्रमाणात जंगलात वाढणाऱ्या बिनविषारी अळंबी ओळखून अस्वल खातात. खाण्यापेक्षा कित्येकदा अधिक नासधूस करतात.
हे करताना खाल्लेल्या अळंबीचे अवशेष जागेवर पडलेले असतात. त्यापासूनच बिनविषारी अळंबी आदिवासी ओळखायला शिकला ते अस्वलापासून.
अळंबी का खावी?
◼️ अळंबीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट, प्रथिने, व्हिटॅमिन डी, सेलेनियम आणि झिंक असते.
◼️ प्रोटेस्ट व स्तनाच्या कर्करोगामध्ये ते गुणकारी असते.
◼️ अळंबी उकळून रोज नाश्त्यामध्ये खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
◼️ मधुमेहींसाठी रक्तातील साखर नियंत्रित राखण्यासाठी उपयोग होतो.
◼️ यातील सेलेनियममुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
◼️ हृदयरोगासाठी याचे सेवन उपयुक्त आहे.
◼️ गॅस, अपचन, पोटदुखी यासारख्या आजारात गुणकारी.
विषारी अळंबी कशी ओळखावी?
कळी असणाऱ्या अळंबी पाण्याने स्वच्छ धुवून व पुसून घ्यावी. हळद व मिठाच्या पाण्यात अर्धा तास बुडवून ठेवावी. पाण्याचा रंग लाल झाला, तर ती विषारी आहेत, असे समजावे. रंग तसाच पिवळा राहिल्यास ती खाण्यास उपयुक्त समजावे.
कशी कराल अळंबीची भाजी?
१) अळंबी कापून घ्यावीत. कढईत तेल गरम करुन कांदा परतून घ्यावा.
२) मसूर घालून चांगली परतून घ्यावी व एक वाफ काढावी त्यानंतर मसाला घालून परतावा व अळंबी घालावी.
३) चवीनुसार मीठ, कोकम घालून वाफ काढून घ्यावी.
४) त्यानंतर ओल्या नारळाचे वाटण व पाणी घालावे.
५) मसूर शिजल्यानंतर भाजी खाण्यासाठी तयार होते.
अधिक वाचा: कापूस पिकातील गळफांदी आणि फळफांदी कशी ओळखायची? वाचा सविस्तर