lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा

गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा

The sugarcane crushing season will soon be over; How much sugar was produced? | गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा

गाळप हंगाम लवकरच आटपणार; किती साखर तयार झाली.. कुणाला मिळाला किती उतारा

राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखरेचा उतारा १०.११ टक्के इतका मिळाला आहे.

राज्यात आतापर्यंत ३३ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली असून, सर्वाधिक ९ कारखाने सोलापूर विभागातील, तर संभाजीनगर विभागातील ८ कारखाने बंद झाले आहेत. राज्यात यंदा २०७ सहकारी व खासगी कारखान्यांनी रोजगार परवाना घेतला होता.

त्यात १०३ सहकारी व १०४ खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी आतापर्यंत ९६६.८२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात ११.४५ टक्के असून, त्याखालोखाल पुणे विभागाचा साखर उतारा १०.३९ टक्के इतका आहे. नांदेड विभागात यंदा विक्रमी १०.०९ टक्के साखर उतारा आला आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूरचा
कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २२३ लाख टन ऊस गाळपातून २५.६ लाख टन साखर उत्पादित केली आहे. पुणे विभागात २०४ लाख उसाच्या गाळपापासून २१.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या विभागाचा सरासरी साखर उतारा सर्वाधित ११.४५ इतका आला आहे.

त्याखालोखाल सोलापूर विभागाने देखील २०१ लाख उसाचे गाळप करून १८.७ लाख टन साखर उत्पादित केली आहे. सोलापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ९.२८ टक्के इतका आहे. नगर विभागात १२४ लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून १२.४ लाख टन साखर तयार झाली आहे. नगर विभागाचा साखर उतारा ९.१९ टक्के इतका आहे.

सर्वाधिक कमी उतारा नागपूर विभागाचा
अमरावती विभागात ९ लाख टन ऊस गाळपातून ८ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. या विभागाचा साखर उतारा ९.२६ टक्के इतका आहे. सर्वात कमी ३ लाख टन उसाचे गाळप नागपूर विभागात करण्यात आले असून, येथे केवळ १.९३ लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. राज्यात सर्वात कमी केवळ ५.४१ टक्केचे साखर उतारा नागपूर विभागाचा आहे.

नांदेड विभागाचा उतारा १०.०९ टक्के
छत्रपती संभाजीनगर विभागातून ९० लाख टन उसाच्या गाळपामधून ७.९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ८.८ टक्के इतका आहे. नांदेड विभागात १०९ लाख टन गाळपातून ११ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. या विभागाचा साखर उतारा १०.०९ टक्के इतका आहे.

Web Title: The sugarcane crushing season will soon be over; How much sugar was produced?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.