Join us

Water Shortage मोलमजुरी करणाऱ्या आईबापाला पाणी टंचाईत साथ देणारे हात, की लेकरांचा जीवाशी खेळ

By रविंद्र जाधव | Updated: May 29, 2024 22:35 IST

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागाची विदारक स्थिती

सध्या सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशातच नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील सोमठाण जोश या गावात मात्र एक वेगळे चित्र बघावयास मिळत आहे.

Nashik_yeola_somthaan_josh

पाचशे सहाशे घरे असलेल्या या दीड हजार लोकसंख्येच्या गावात दर तीन दिवसांनी अवघे एक टँकर पाणी येते. मुख्य मोलमजुरी व्यवसाय असलेल्या या नागरिकांना उदरनिर्वाह करिता दररोज बाहेर जावं लागतं. त्यामुळे घरातील लहान लेकरांवर घरच्या पाण्याची जबाबदारी आहे. 

दर तीन दिवसांनी येणार्‍या टँकर सोबत गर्दी ही होतेच अशावेळी काहींना हे पाणी मिळत तर काहींना नाही. तेव्हा अशा परिस्थितीत गावातील एका सरकारी विहिरीवर सोमठाण जोशचे ग्रामस्थ आपली तहान भागवत आहे.

यात अगदी लहानगे सुद्धा विहिरीवर जाऊन पाणी आपल्या घराकडे डोईवर नेताना, विहरीतून पाणी ओढताना जीवाशी खेळ खेळत आहे. water_shortage

गेल्या तीन महिन्यांपासून दररोज इथून पाणी न्याव लागत तेव्हा कुठे घरी प्यायला पाणी असत हे सांगताना ९ वीचा विद्यार्थी नितिन राठोड पुढे म्हणाला की, आई वडील मोलमजुरी करतात मी एकटा आहे. आई वडील येई पर्यंत टाकीभर पाणी भराव लागत. विहरीवर गर्दी वाढली की पाणी संपत मग पाणी मिळत नाही म्हणून सकाळी लवकर तर कधी दुपारी पाणी घेऊन जातो.

राजापूर ग्रुप ग्रामपंचायत या गावाचा कारभार बघते. लहान गाव असल्याने आमच्या समस्येकडे विशेष कोणीही लक्ष देत नाही. हे पाणी पिऊन अनेकांना जुलाब उलटी असे प्रकार होत आहे. पण आता आहे ते पाणी गरम करून आम्ही पितो आमच्याकडे दूसरा पर्याय नाही. - मनोज चव्हाण  

हेही वाचा - Aloeveras Health benefits & Products गुणकारी कोरफडीचे आरोग्यदायी फायदे व उत्पादने

टॅग्स :पाणीकपातनाशिकपाणी टंचाईलहान मुलंउष्माघातशेतकरीग्रामीण विकास