Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता

देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता

The future of Devgad Hapus now depends on the new bloom arrival; There is a strong possibility of a decrease in production | देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता

देवगड हापूसचं भवितव्य आता येणाऱ्या नवीन मोहोरावरच; उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता

तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : तालुक्यामध्ये यावर्षी हापूस आंबा कलमांना नोव्हेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर आला होता. मात्र, या मोहोराला फळधारणा (कणी) कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे.

यामुळे यावर्षीचे आंबा उत्पादन फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणा या आंबा मोहोरावर अवलंबून राहणार आहे. तालुक्यामध्ये यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजेच सुमारे ७० टक्के आंबा कलमांना मोहोर आला होता.

यामुळे यावर्षी समाधानकारक पीक येणार असल्याच्या आशा आंबा बागायतदारांच्या पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या मोहोराला कमी फळ धारणा व काही मोहोर वांझ असल्याचे दिसून येत आहे.

जानेवारी महिन्यामध्ये शिल्लक राहिलेल्या हापूस आंबा कलमांना मोहोर येणार असल्याचे दिसत होते. मात्र हा देखील मोहोर लांबला असून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोहोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याच शेवटच्या टप्प्यातील येणाऱ्या मोहोराला फळधारणा चांगल्या प्रकारे होऊ शकते व याच मोहोरावर याववर्षीचे हापूस आंब्याचे एकूण उत्पादन अवलंबून राहणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आंबा कलमांना पहिल्या टप्प्यातील यावर्षी मोहोर आला होता. सुरुवातीच्या टप्प्यातील आंबा कलमांना तालुक्यामध्ये सुमारे ७० टक्के मोहोर आला होता.

यामुळे आंबा बागायतदारांनी आंबा कलमांना कीटकनाशक फवारणी कृषी सल्ल्यानुसारच व नियोजनबद्ध केली आहे. मात्र, या मोहोराला फळधारणा कमी असल्याचे दिसून येत आहे.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आंबा मोहोराला खार या द्रव्याने ग्रासले होते. मात्र, वेळोवेळी कीटकनाशक फवारण्या करून आंबा पीक वाचविण्याच्या दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणात बागायतदारांनी मेहनत घेतली.

मात्र, वांझ मोहोर जास्त प्रमाणात असल्याने आंबा बागायतदार हतबल झाले आहेत. यामुळे यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याची शक्यता आहे.

उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता
◼️ दोन वर्षांपूर्वी थ्रीप्स या रोगाने आंबा पिकावर थैमान घातल्याने आंबा उत्पादन घटले होते. तर गतवर्षी आंबा कलमांना मोहोरच कमी आल्यामुळे आंबा उत्पादन घटले होते.
◼️ तर यावर्षी प्रचंड प्रमाणात आंबा कलमांना मोहोर येऊन फळधारणा कमी असल्यामुळे आंबा उत्पादनामध्ये घट होणार असल्याचे आंबा बागायतदार वर्गातून सांगण्यात येत आहे.

आंबा पीक टिकविण्याची बागायतदारांसमोर कसोटी
◼️ बदलत्या वातावरणामध्ये व नवनवीन संकटांना सामोरे जाऊन आंबा पीक टिकविण्याची आंबा बागायतदारांसमोर कसोटी निर्माण झाली आहे.
◼️ यावर्षीचे आंबा उत्पादन किती टक्के होणार जानेवारी महिना संपला तरी आंबा बागायतदारांना सांगता येणे कठीण झाले आहे.
◼️ यामुळे अद्यापही आंबा उत्पादनाचे चित्र स्पष्ट होत नसल्याने यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन किती प्रमाणात मिळणार हे सांगणे कठीण आहे

उत्पादनापेक्षा खर्च जास्त होण्याची शक्यता
◼️ दरवर्षी आंबा बागायतदार शेतकऱ्यांना नवनवीन संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
◼️ तर यावर्षी आंबा कलमांना जास्त प्रमाणात मोहोर आल्यामुळे कीटकनाशक फवारणीचा खर्चदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
◼️ यामुळे यावर्षी उत्पादनापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था होते की काय अशी भीतीदेखील आंबा बागायतदारांमध्ये आहे.

अधिक वाचा: नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता

Web Title : देवगढ़ हापुस का भविष्य नए फूल पर निर्भर; उत्पादन घटने की संभावना

Web Summary : देवगढ़ में हापुस आम की उपज देर से खिलने वाले फूलों पर निर्भर है। शुरुआती फूलों में फल कम लगने की वजह से किसानों को उत्पादन घटने का डर है। कीटनाशक प्रयासों के बावजूद 'बांझ' फूल और कीटों की समस्याओं से लागत बढ़ने की आशंका है।

Web Title : Devgad Hapus mango future depends on the new bloom; production likely to decrease

Web Summary : Devgad's Hapus mango yield hinges on the late February bloom after initial blooms showed poor fruit set. Farmers fear reduced production due to 'barren' flowers and pest issues despite pesticide efforts, potentially increasing costs over profits.