Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत केली १०० रुपयांची वाढ; आता टनाला काय भाव मिळणार?

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत केली १०० रुपयांची वाढ; आता टनाला काय भाव मिळणार?

The central government has increased the FRP of sugarcane by Rs 100; What price will you get per ton now? | केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत केली १०० रुपयांची वाढ; आता टनाला काय भाव मिळणार?

केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत केली १०० रुपयांची वाढ; आता टनाला काय भाव मिळणार?

sugarcane frp 2026-27 उसाच्या एफआरपीत वाढ याचा लाभ देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादकांना तसेच साखर उद्योगाशी संबंधित पाच लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

sugarcane frp 2026-27 उसाच्या एफआरपीत वाढ याचा लाभ देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादकांना तसेच साखर उद्योगाशी संबंधित पाच लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे.

कोल्हापूर : उसाच्या एफआरपीत प्रति टनामागे १०० रुपयांची वाढ करून ती ३,६५० रुपये करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला. हा दर २०२६-२७ साठी असेल.

हा दर उत्पादन खर्चापेक्षा १००.५ टक्क्यांनी जादा आहे. याचा लाभ देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादकांना तसेच साखर उद्योगाशी संबंधित पाच लाख कर्मचाऱ्यांना होणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली.

प्रति टन ३,६५० रुपये हा दर १०.२५ टक्के साखर उताऱ्याकरिता असेल. यापुढील प्रत्येक टक्क्याला प्रति टन ३५६ रुपये जादा द्यावे लागतील.

मात्र, उतारा साडेनऊ टक्क्यांपेक्षा खाली गेल्यास प्रति टन ३,३८३ रुपये दर देणे साखर कारखान्यांना बंधनकारक राहणार आहे.

उसाचा उत्पादन खर्च प्रति टन १८२० रुपये
◼️ २०२६-२७ साठी उसाचा उत्पादन खर्च १,८२० रुपये प्रति टन केंद्र सरकारने गृहीत धरला आहे.
◼️ टनाला ३,६५० रुपये हा दर या उत्पादन खर्चापेक्षा १००.५ टक्क्यांनी जादा आहे.
◼️ तर एफआरपीत केलेली वाढ ही २.८१ टक्के इतकी असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
◼️ एक ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या हंगामासाठी नवे दर लागू राहतील.
◼️ २०२५-२६ या हंगामात हीच एफआरपी ३,५५० रुपये प्रति टन होती.

उसाच्या एफआरपीतील वाढ स्वागतार्ह आहे. मात्र साखरेचा उत्पादन खर्च प्रतिटन १८२० रुपयांपेक्षा कितीतरी जादा आहे. साखरेच्या किमान विक्री दरात वाढ होत नसल्याने साखर उद्योगाची कोंडी होत आहे. हा उद्योग टिकण्यासाठी साखरेचा किमान विक्रीदरही वाढवणे गरजेचे आहे. - विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

एफआरपी वाढविण्याचा निर्णय शेतकरी हिताचा असल्याने स्वागतार्ह आहे. पण ही एफआरपी साखरेच्या किमान विक्री दराशी निगडित करण्याची गरज आहे. अन्यथा साखर उद्योग कोलमडून पडेल. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

एफआरपीमध्ये करण्यात आलेली वाढ नगण्य आहे. किमान टनामागे ३०० रुपये वाढ हवी होती. उत्पादन खर्च १८२० रुपये हा अत्यंत कमी आहे. रासायनिक खताचे वाढते दर, वाढलेली मजुरी आणि संभाव्य डिझेल दरातील वाढ, यामुळे उसाचा उत्पादन खर्च एकरी ७ ते ८ हजार रुपयांनी वाढणार आहे. सरकारने १८२० रुपयांत एक टन ऊस पिकवून दाखविल्यास शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन आले असे समजून मी चळवळीतून निवृत्ती घेतो. - राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

अधिक वाचा: शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा

Web Title : केंद्र सरकार ने गन्ने के एफआरपी में ₹100 की बढ़ोतरी की; नई दर घोषित

Web Summary : केंद्र सरकार ने 2026-27 सीज़न के लिए गन्ने के एफआरपी में ₹100 की बढ़ोतरी करके ₹3,650 प्रति टन कर दिया। इससे 5 करोड़ किसानों और 5 लाख चीनी उद्योग के श्रमिकों को लाभ होगा। यह दर उत्पादन लागत से 100.5% अधिक है, चीनी रिकवरी दरों के लिए समायोजन के साथ।

Web Title : Central Govt Increases Sugarcane FRP by ₹100; New Rate Announced

Web Summary : The central government increased sugarcane FRP by ₹100 to ₹3,650 per ton for the 2026-27 season. This benefits 5 crore farmers and 5 lakh sugar industry workers. The rate is 100.5% above production cost, with adjustments for sugar recovery rates.