Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > खरीप हंगाम पिक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल लागला; वाचा तुमच्या जिल्ह्यातील विजेत्या शेतकऱ्यांची यादी

खरीप हंगाम पिक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल लागला; वाचा तुमच्या जिल्ह्यातील विजेत्या शेतकऱ्यांची यादी

State-level results of Kharif season crop competition announced; Read the list of winning farmers from your district | खरीप हंगाम पिक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल लागला; वाचा तुमच्या जिल्ह्यातील विजेत्या शेतकऱ्यांची यादी

खरीप हंगाम पिक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल लागला; वाचा तुमच्या जिल्ह्यातील विजेत्या शेतकऱ्यांची यादी

kharif pik spardha 2025 nikal राज्यात खरीप हंगाम सन २०२५ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

kharif pik spardha 2025 nikal राज्यात खरीप हंगाम सन २०२५ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या पिक उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

राज्यात खरीप हंगाम सन २०२५ मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग व सुर्यफुल या ११ पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पीक स्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत घेऊन राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील बक्षीस देण्यात येतात.

खरीप हंगाम सन २०२५ पिक स्पर्धेचे राज्यस्तरीय निकाल मा.आयुक्त कृषी यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक स्पर्धा निकाल समितीद्वारे दिनांक ०८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आले.

ज्या शेतकऱ्यांची स्पर्धेत भाग घेतलेल्या पिकाची उत्पादकता तालुक्याच्या त्या पिकाच्या सरासरी उत्पादकतेच्या (त्या पिकाची मागील पाच वर्षांचे सरासरी उत्पादकता) दीडपट किंवा त्यापेक्षा अधिक आहे, अशा शेतकऱ्यांना पीक स्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येते.

पीक स्पर्धा खरीप हंगाम २०२५ राज्यस्तरीय  विजेते शेतकरी तपशील सोबत जोडला आहे. पीकस्पर्धेमध्ये उच्चतम उत्पादकता असणाऱ्या विजेत्यांनी अवलंबिलेली पिक पद्धती व तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांपर्यत घडीपत्रिका व इतर प्रचार प्रसार माध्यमाद्वारे पोहोचविले जाते.

खरीप हंगाम २०२५-२६ राज्यस्तरीय निकाल

पीक व गटक्रमांकविभागशेतकऱ्याचे नावगावतालुकाजिल्हाउत्पादन (क्विं./हे.)
सोयाबीन सर्वसाधारणलातूरश्री. गुलाब रूकमोद्दीन शेखजाजनूरनिलंगालातूर77.62
सोयाबीन सर्वसाधारणकोल्हापूरश्री. नारायण गंगाधर पुजारीशिरोळशिरोळकोल्हापूर76.68
सोयाबीन सर्वसाधारणकोल्हापूरश्रीमती जयश्री गणपती कुंभारअर्जुनवाडकागलकोल्हापूर76.43
सोयाबीन आदिवासीपुणेभाऊ तुळशिराम वारेओतुरजुन्नरपुणे49.56
सोयाबीन आदिवासीपुणेरामचंद्र विठोबा कातवारेआलमेजुन्नरपुणे49.49
सोयाबीन आदिवासीपुणेअशोक राघु नाईकरेकमानखेडपुणे44.22
सूर्यफूल सर्वसाधारणपुणेनारायण बाबा लोणकरकऱ्हाटीबारामतीपुणे28.70
सूर्यफूल सर्वसाधारणपुणेपांडुरंग मारुती वाबळेजळगाव कपबारामतीपुणे27.05
सूर्यफूल सर्वसाधारणकोल्हापूरश्रीमती कमलाबाई बसवराज कुंभारसंखजतसांगली24.00
मका सर्वसाधारणकोल्हापूरश्री. दिनकर सिताराम गलांडेतुरचीतासगावसांगली191.70
मका सर्वसाधारणपुणेअशोक विठ्ठल कारंडेनिमगावमाळशिरससोलापूर184.61
मका सर्वसाधारणपुणेशत्रुघ्न ज्ञानदेव बर्गेबांगर्डेमाळशिरससोलापूर179.76
मका आदिवासीनाशिकदेवबा शंकर जगतापदेवपूरसटानानाशिक149.31
मका आदिवासीनाशिकश्री. संजय भिका जगतापदेवपूरसटानानाशिक137.70
मका आदिवासीनाशिकश्रीमती सुमनबाई मोतीराम कोल्हेशिंगाशीकळवणनाशिक123.18
भात सर्वसाधारणकोल्हापूरश्री. सदशिव चनगौंडा कतगरसुळकुडकागलकोल्हापूर135.79
भात सर्वसाधारणकोल्हापूरश्री. बाबासो सायगौंडा पाटीलपिंपळगाव बु.कागलकोल्हापूर120.59
भात सर्वसाधारणकोल्हापूरश्री. चंद्रकांत जोतिराम लाडकरंजे त. परळीसातारासातारा102.20
भात आदिवासीपुणेलक्ष्मण डोंगरू लोहकरेमापोलीआंबेगावपुणे77.38
भात आदिवासीपुणेरामचंद्र चाहू कारोटेदिगदआंबेगावपुणे76.99
भात आदिवासीनाशिकश्री. मुरलीधर रामभाऊ बोंबलेमोडाळेइगतपुरीनाशिक73.54
बाजरी सर्वसाधारणकोल्हापूरश्री. अशोक चंद्रु नलावडेविरळीमाणसातारा86.22
बाजरी सर्वसाधारणकोल्हापूरसौ. सविता अरुण मुळीकसासकलफलटणसातारा65.73
बाजरी सर्वसाधारणपुणेश्री. रायचंद बाबुराव शिंदेविठ्ठलवाडीशिरूरपुणे65.52
बाजरी आदिवासीनाशिकश्रीमती उषाबाई श्रीराम पावराहिंगोनिपाडाशिरपूरधुळे25.56
बाजरी आदिवासीनाशिकश्री. संदीप बद्री पावराहिंगोनिपाडाशिरपूरधुळे25.38
बाजरी आदिवासीनाशिकश्री. विठ्ठल झिपा पारधीखंबाळेशिरपूरधुळे23.87
मुग सर्वसाधारणलातूरश्री. गुलाब रुकमोद्दिन शेखजाजनूरनिलंगालातूर45.20
मुग सर्वसाधारणलातूरश्री. विशाल मधूकर धूमाळशेडोळनिलंगालातूर43.60
मुग सर्वसाधारणलातूरश्री. गोविंद रावसाहेब बिरादारसांगवी घुग्गीशि. अनंतपाळलातूर28.25
मुग आदिवासीनाशिकश्री. वसंत नारायण राउतविहीरगावसाक्रीधुळे11.55
उडीद सर्वसाधारणपुणेउमाकांत शंकर भोईटेबार्शीबार्शीसोलापूर60.53
उडीद सर्वसाधारणपुणेअमितकुमार दिलीप खटोडबार्शीबार्शीसोलापूर59.39
उडीद सर्वसाधारणपुणेबाळासाहेब पांडुरंग धुमाळखांडवीबार्शीसोलापूर57.45
उडीद आदिवासीपुणेनंदकुमार गणपत पवारखांडवीबार्शीसोलापूर47.77
उडीद आदिवासीलातूरश्री. चंद्रकांत दिगंबर माडीबोयणेपालापूरनिलंगालातूर23.38
उडीद आदिवासीनाशिकश्रीमती सुंदरीबाई सयाजी गायकवाडकोठुळासुरगाणानाशिक13.38
भुईमूग सर्वसाधारणकोल्हापूरश्री. शिवाजी सदाशिव चौगुलेअर्जुनवाडाराधानगरीकोल्हापूर56.15
भुईमूग सर्वसाधारणकोल्हापूरश्री. दत्तात्रय बाळा कसलकरतमनाकवाडाकागलकोल्हापूर56.14
भुईमूग सर्वसाधारणकोल्हापूरश्री. धनंजय बाळकृष्ण पाटीलबोरगाववाळवासांगली51.26
नाचणी सर्वसाधारणकोल्हापूरश्री. नारायण रामू कडूकरकेनिवाडीचंदगडकोल्हापूर89.32
नाचणी सर्वसाधारणकोल्हापूरश्री. वसंत मनोहर शेटगेउकिरभाटलेभुदरगडकोल्हापूर82.30
नाचणी सर्वसाधारणकोल्हापूरश्री. धोंडीबा ओमान शिट्याळकरकरंजगावचंदगडकोल्हापूर79.41
नाचणी आदिवासीनाशिकश्री. प्रभाकर कासू गावितसांबरखलसुरगाणानाशिक29.02
नाचणी आदिवासीनाशिकश्रीमती इंदुमती गोपाळ गायकवाडपळसनसुरगाणानाशिक23.28
नाचणी आदिवासीनाशिकश्रीमती रुपीबाई येसाराम गायकवाडवाल्ह्वेसाक्रीधुळे16.45
ज्वारी सर्वसाधारणनाशिकश्री. नितीन भोजराज राणेवढोदा प्र.यावलजळगाव42.16
ज्वारी सर्वसाधारणनाशिकश्री. गणपत झिपरु चौधरीमस्कावद सीमरावेरजळगाव38.30
ज्वारी सर्वसाधारणनाशिकश्री. दिलीप देवचंद चौघरीआमोदेयावलजळगाव38.12
ज्वारी आदिवासीनाशिकश्री. केला नाथा वसावेधांद्रे बु.शहादानंदुरबार25.096
तूर सर्वसाधारणपुणेविनोद शिवाजी धुमाळखांडवीबार्शीसोलापूर58.05
तूर सर्वसाधारणपुणेद्रौपदा दत्तू जाधवनवीलोटे वाडीसांगोलासोलापूर56.41
तूर सर्वसाधारणपुणेश्रद्धा संजय अवताडेखांडवीबार्शीसोलापूर51.91
तूर आदिवासीनाशिकश्रीमती गहिनाबाई गुलशेर जमादारलोहारेरावेरजळगाव34.50
तूर आदिवासीनाशिकजमीर नुरखा तडवीलोहारेरावेरजळगाव22.59
तूर आदिवासीनागपूरश्री. रामचंद्र दगडू मसरामतुमडीनागपूरनागपूर20.66

अधिक वाचा: शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला अखेर मंजुरी; आता 'या' १३ जिल्ह्यांतून जाणार हायवे

Web Title : खरीफ फसल प्रतियोगिता परिणाम घोषित: यहां देखें जिला विजेताओं की सूची

Web Summary : महाराष्ट्र ने खरीफ 2025 फसल प्रतियोगिता के परिणाम घोषित किए। राज्य, जिला और तालुका स्तर पर ग्यारह फसलों में विजेताओं का चयन किया गया। प्रतियोगिता का उद्देश्य नवीन कृषि पद्धतियों को प्रोत्साहित करके और सफल तकनीकों को अन्य किसानों के साथ साझा करके कृषि उत्पादन को बढ़ावा देना है।

Web Title : Kharif Crop Competition Results Announced: List of District Winners Here

Web Summary : Maharashtra announces Kharif 2025 crop competition results. Winners were selected across eleven crops, with awards given at the state, district, and taluka levels. The competition aims to boost agricultural production by encouraging innovative farming practices and sharing successful techniques with other farmers.