Lokmat Agro >शेतशिवार > सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर

Seven hundred acres of grape orchard destroyed in this taluka of Solapur district; Read in detail | सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर

एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अक्कलकोट : एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे.

वाढती मजुरी, पावसाची अनिश्चितता, औषध, खताच्या किमतीत भरमसाठ वाढ, अशा एक ना अनेक कारणांमुळे शेतकरी द्राक्ष बागांकडे पाठ फिरवत आहेत. दिवसेंदिवस पाऊस कमी होत आहे.

परिणामी विहीर, बोअर, कूपनलिका, तलावात पाणीसाठा कमी होत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्व स्रोत कोरडेठाक पडत आहेत. मजुराच्या मजुरीत दिवसेंदिवस भरमसाठ वाढ होत आहे.

तसेच औषधे व खताच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. तसेच बेदाणा वाळवत असताना अवकाळी पाऊस, वादळ-वारा याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

एकंदरीत दूषित वातावरण व वाढत्या महागाईमुळे द्राक्ष शेती परवडेना. अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ७०० एकरवरील द्राक्ष बागा कुऱ्हाडीने कापून टाकण्यात येत आहेत.

मागील दहा वर्षापूर्वी अक्कलकोट तालुक्यात द्राक्ष बागा दुर्मीळपणे दिसत होत्या. हल्ली बागा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या. शेतकऱ्यांना याबाबत गोडी निर्माण झाली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे सध्या द्राक्ष बागायतदार मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत.

१५०० एकरवर द्राक्ष बागा होत्या
यंदा रेकॉर्ड ब्रेक उन्ह आणि सतत होणारा विजेची लपंडाव, अशा एक ना अनेक कारणाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे याकडे पाठ फिरवली आहे. वर्षभरापूर्वी तालुक्यात १५०० एकरवर द्राक्ष बागा होत्या. त्या आता कमी होत आहेत.

पाण्याचे स्त्रोत बंद; द्राक्षाची गुणवत्ता खालावली
द्राक्ष बागेची नवीन लागवड शून्य आहे. असलेले ७०० एकर द्राक्ष शेतकऱ्यांनी काढून टाकले आहे. वेळेवर मुबलक पाऊस झाला नाही. परिणामी, पाण्याचे सर्व स्रोत बंद पडलेले आहेत. रासायनिक खताच्या किमती वाढल्या आहेत. मजुरांच्या मजुरीत दुपटीने वाढ झाली आहे. संकटातून कसेबसे द्राक्ष हाती लागल्यानंतर वाळवून बेदाणा तयार करताना अवकाळी पावसाच्या फटक्याने गुणवत्ता खालावत असते.

द्राक्ष पिकामुळे उत्पन्न होण्याऐवजी अर्थिक नुकसान होत आहे. परिणामी, नवीन द्राक्ष लागवड होताना दिसत नाही. द्राक्ष बागा काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सपाटा लावला आहे. त्याऐवजी तूर, सोयाबीन, उडीद, मूग या पारंपरिक पिकांबरोबर उसाच्या शेतीत वाढ होत आहे. मागील वर्षभरात ७००८ एकर द्राक्ष क्षेत्र कमी झाले आहे. - दत्तकुमार साखरे, संचालक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे

 अधिक वाचा: ई-मोजणी 'व्हर्जन २' मुळे राज्यात जमीन मोजण्या होतायत वेगात; शिल्लक मोजण्या लवकरच होणार

Web Title: Seven hundred acres of grape orchard destroyed in this taluka of Solapur district; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.