Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > वाढत्या लाईट बिलाबरोबर आली सुरक्षा ठेवीची नोटीस; डिपॉजिट म्हणून आता किती रुपये द्यावे लागणार?

वाढत्या लाईट बिलाबरोबर आली सुरक्षा ठेवीची नोटीस; डिपॉजिट म्हणून आता किती रुपये द्यावे लागणार?

Security deposit notice comes with increasing electricity bill; How much will I have to pay as deposit now? | वाढत्या लाईट बिलाबरोबर आली सुरक्षा ठेवीची नोटीस; डिपॉजिट म्हणून आता किती रुपये द्यावे लागणार?

वाढत्या लाईट बिलाबरोबर आली सुरक्षा ठेवीची नोटीस; डिपॉजिट म्हणून आता किती रुपये द्यावे लागणार?

उन्हाळ्यात वीज वापर वाढून बिल वाढले असताना ग्राहकांना महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

उन्हाळ्यात वीज वापर वाढून बिल वाढले असताना ग्राहकांना महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

उन्हाळ्यात वीज वापर वाढून बिल वाढले असताना ग्राहकांना महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत.

वीज वापरात वाढ झाल्यास संभाव्य थकबाकीचा धोका लक्षात घेऊन अतिरिक्त सुरक्षा ठेव आकारली जाते. एप्रिल, मे महिन्यांच्या बिलात अतिरिक्त सुरक्षा ठेव किंवा एएसडी नावाने ही रक्कम दर्शविलेली असते.

कशामुळे वाढला वापर?
◼️ फॅन, कुलर, एसीमुळे वीज वापर वाढला असून, यंदा राज्यात तापमान ४५ अंशांपर्यंत नोंदविले गेले.
◼️ हा रेकॉर्ड असून, प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण असल्याने पंखे, एसी, कुलरला मागणी वाढली आहे.

अतिरिक्त सुरक्षा ठेव बिले
◼️ महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या नियमांनुसार, ग्राहकाच्या सरासरी दोन महिन्यांच्या वीज बिलाइतकी सुरक्षा ठेव महावितरणकडे असणे आवश्यक आहे.
◼️ कुणाला ५०, तर कुणाला पाच हजारांपर्यंत अनामत रक्कम बिले पोहोचली आहेत.

...तर परतावाही मिळतो
◼️ उन्हाळ्यात विजेचा वापर (उदा. एसी, फ्रीज) कमी केल्यास पुढील बिलातील सरासरी कमी होईल, ज्यामुळे भविष्यात सुरक्षा ठेव कमी लागू शकते.
◼️ भविष्यात जर तुम्ही कनेक्शन कायमचे बंद केले तर ही सर्व रक्कम व्याजासह परत मिळते.

संभाव्य थकबाकीचा धोका लक्षात घेऊन बिले
◼️ उन्हाळ्यात वापर वाढल्यामुळे सरासरी बिल वाढते.
◼️ जर तुमची जुनी ठेव या वाढलेल्या बिलाच्या तुलनेत कमी पडत असेल, तर महावितरण म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेव मागते.

समान मासिक हप्त्यांत भरण्याची सुविधा
◼️ जर सुरक्षा ठेव रक्कम मोठी असेल, तर महावितरण सहसा ती दोन ते तीन हप्त्यांमध्ये भरण्याची परवानगी देते.
◼️ तुम्ही तुमच्या स्थानिक उपविभागीय कार्यालयात जाऊन हप्त्यांसाठी विनंती करू शकता. ही अतिरिक्त सुरक्षा ठेव आहे, बिल नाही.

अधिक वाचा: एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या लाईट बिलात अजून १५ टक्के सवलत; वाचा कुणाला मिळणार लाभ?

Web Title : बढ़ते बिजली बिल के साथ सुरक्षा जमा नोटिस; अब कितना भुगतान करें?

Web Summary : गर्मी में बिजली की खपत बढ़ने से महावितरण ने सुरक्षा जमा नोटिस भेजे। पंखे, एसी से बिल बढ़े। संभावित बकाया के लिए जमा राशि जरूरी। किश्तों का विकल्प उपलब्ध; सेवा समाप्ति पर ब्याज सहित वापसी।

Web Title : Rising electricity bills bring security deposit notices; how much to pay?

Web Summary : Increased summer electricity usage prompts Mahavitaran to issue security deposit notices. Usage spikes from fans and ACs drive up bills. Deposits ensure coverage for potential arrears. Installment options are available; deposits are refundable with interest upon service termination.