Join us
Daily Top 2Weekly Top 5

शक्तिपीठ महामार्गाचा सुधारित आराखडा आला; राज्यातील 'या' १०८ गावांचा नव्याने समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 16:33 IST

Shaktipeeth Highway new update वर्धा ते सिंधुदुर्ग (पत्रादेवी) दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र शासनाने गुरुवारी सुधारित अधिसूचना जारी केली आहे.

कोल्हापूर : वर्धा ते सिंधुदुर्ग (पत्रादेवी) दरम्यान प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठीमहाराष्ट्र शासनाने गुरुवारी सुधारित अधिसूचना जारी केली असून, कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ७९ गावांचा या महामार्गात समावेश करण्यात आला आहे.

यांमध्ये करवीर, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड तालुक्यातील गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार महामार्गाचे नवीन संरेखन (अलायमेंट) निश्चित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध अधिसूचनेनुसार हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वे सुमारे ८०२.६ किलोमीटर लांबीचा असून, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांना जोडणार आहे. हा महामार्ग पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) दरम्यान उभारण्यात येणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, गगनबावडा, कागल, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांतील ७९ गावांमधून महामार्गाचे संरेखन करण्यात आले आहे.

दरम्यान, सुधारित अधिसूचनेनंतर पुन्हा एकदा शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्गासाठी सुपीक शेती, वनक्षेत्र तसेच काही ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भाग बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे या प्रकल्पाला काही भागांतून तीव्र विरोधही सुरू आहे. राजपत्रातील माहितीनुसार, पूर्वीच्या अधिसूचनेतील काही गावांच्या सीमांमध्ये आणि संरेखनात बदल करण्यात आले असून, त्यानुसार नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ७९ गावांचा समावेश
कोल्हापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ७९ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
◼️ हातकणंगले : पारगाव.
◼️ पन्हाळा : बहिरेवाडी, जाखले, गिरोली, पोहाळे तर्फ आळते, कुशिरे तर्फ ठाणे.
◼️ करवीर : केर्ली, केर्ले, वरणगे, पाडळी बुद्रुक, शिंदेवाडी, खुपिरे, वाकरे, कुडीत्रे, बहिरेश्वर, कसबा बीड, हसूर दुमाला, सोनाळी, भाटणवाडी, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, शिरोली दुमाला, गणेशवाडी.
◼️ राधानगरी : माळवे, कपिलेश्वर, तुरंबे, तळाशी, माजगाव, कुऱ्हाडवाडी, ठिकपुर्ती, पिंपळवाडी, कौलव, चाफोडी तर्फ तारळे, मोहर्डे, वाघेवाडी, कोदवडे, राशिवडे बुद्रुक.
◼️ कागल : बोरवडे, उंदरवाडी.
◼️ भुदरगड : पुष्पनगर, नाधवडे, कोनवडे, निळपण, दारवाड, म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, सोनारवाडी, मडूर, कारडवाडी, शेळेवाडी, पडखंबे, सोनुर्ली, मेघोली, बेडिव, आरळगुंडी.
◼️ आजरा : कोरीवडे, हरपवडे, पेरणोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी, आजरा, मसोली, कर्पेवाडी खालसा, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.
◼️ चंदगड : गवसे, बुजवडे, कुरपी, इनाम म्हाळुंगे, बिजूर, कानूर बुद्रुक, भोगोली, पिळनी, जांबरे, हलापूर.

सांगली जिल्ह्यातील २९ गावांचा समावेश
सांगली जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील २९ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
◼️ खानापूर : माहुली, वलखड, चिखलहोळ, भाकूचीवाडी, नागेवाडी, घाणवड, हिंगणगाडे, विटा, भावळणी.
◼️ कडेगाव : नेवरी, आंबेगाव, वडियेरायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्र, कुंभारगाव.
◼️ पलूस : कुंडल, घोगाव.
◼️ वाळवा : मसुचीवाडी, जुनेखेड, बोरगाव, वाळवा, उरुण, कामेरी, येडेनिपाणी, इटकरे, येलूर, कुरळप, ऐतवडे खुर्द.

अधिक वाचा: शेतकरी बांधवांनो कर्जमाफीचा लाभ हवा! तर 'या' कागदपत्राचे आजच प्रमाणीकरण करा

English
हिंदी सारांश
Web Title : Revised Shaktipeeth Highway Plan Includes 108 Villages in Maharashtra

Web Summary : Maharashtra's revised Shaktipeeth Highway plan includes 108 villages, impacting Kolhapur and Sangli districts. The 802.6 km greenfield expressway connecting Wardha to Sindhudurg faces opposition due to potential environmental and agricultural impact. New alignments have been defined.
टॅग्स :शक्तिपीठ महामार्गमहामार्गकोल्हापूरसांगलीशेतकरीशेतीमहाराष्ट्रराज्य सरकारसरकारसिंधुदुर्ग