Lokmat Agro >शेतशिवार > Ranbhaji Mahotsav : पौष्टिक भाज्यांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी रानभाजी महोत्सव

Ranbhaji Mahotsav : पौष्टिक भाज्यांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी रानभाजी महोत्सव

Ranbhaji Mahotsav : Wild Vegetable Festival to make people aware about nutritious vegetables | Ranbhaji Mahotsav : पौष्टिक भाज्यांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी रानभाजी महोत्सव

Ranbhaji Mahotsav : पौष्टिक भाज्यांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी रानभाजी महोत्सव

कोणत्याही लागवडीशिवाय, कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय उगवलेल्या, वाढलेल्या रानभाज्यांमध्ये आरोग्यासाठी पौष्टिक गुणधर्म असतात.

कोणत्याही लागवडीशिवाय, कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय उगवलेल्या, वाढलेल्या रानभाज्यांमध्ये आरोग्यासाठी पौष्टिक गुणधर्म असतात.

शेअर :

Join us
Join usNext

आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृद्ध करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृद्ध करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग, प्रकल्प संचालक 'आत्मा' यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात विविध ठिकाणी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव, रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात येते

कोणत्याही लागवडीशिवाय, कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय उगवलेल्या, वाढलेल्या रानभाज्यांमध्येआरोग्यासाठी पौष्टिक गुणधर्म असतात.

विशेषतः भारंगी, दिंडा, कुई, केना, कुडाच्या शेंगा, आघाडा, टाकळा, आंबाडी, पानाचा ओवा, कपाळफोडी, शेवगा, पिंपळ, बांबू, सुरण, करटोली, मटारू, माठ, चिवळ, घोळभाजी, भुई आवळा, कवठ, केळफूल या रानभाज्यांमध्ये अँटी ऑक्साईड, अ, ब, क, इ ही जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने व तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर आहेत.

या भाज्यांमध्ये उष्मांक मूल्यही कमी असल्याने मधुमेहींसाठी वरदान आहेत. काळाच्या ओघात माहितीअभावी रानभाज्या खाण्याचे प्रमाण कमी होत आहे.

नागरिकांना त्याचे महत्त्व कळावे आणि खेडोपाडी राहणाऱ्या शेतकऱ्याचा आर्थिक फायदा व्हावा, यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव विविध जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत.

अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

Web Title: Ranbhaji Mahotsav : Wild Vegetable Festival to make people aware about nutritious vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.