पुणे : पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाचा मोबदला निश्चित झाल्यानंतर सोमवारपासून (दि. ४) प्रत्यक्षात संपादनास सुरुवात झाली.
त्यानुसार पहिल्या दिवशी सुमारे साडेचारशे एकर जमिनीचे करारनामे करण्यात आले. 'प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
करारनाम्या नंतर लगेचच मोबदला देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. विमानतळासाठीपुरंदर तालुक्यातील सात गावातील तीन हजार एकर जागा संपादित करण्यात येणार आहे.
त्यासाठीची आवश्यक ती सर्व प्रक्रिया यापूवीच पूर्ण करण्यात आली आहे. मात्र जागा मालकांना जागेचा द्यावयाचा मोबदला निश्चित होत नसल्याने प्रत्यक्षात भूसंपादनास सुरुवात झाली नव्हती.
मागील आठवड्यात भूसंपादनाचा दर राज्य सरकारकडून अंतिम करण्यात आला. जिल्हा प्रशासनाकडून चार मेपासून मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
त्यानुसार आजपासून प्रत्यक्षात भूसंपादनाला सुरुवात झाली. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले होते.
त्यानुसार आज पहिल्या दिवशी सात गावातील सुमारे साडेचारशे एकर जागेचे करारनामे करण्यात आले, असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लागणारा भूसंपादनासाठी निधीसाठी सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज हुडकोकडून घेण्यास राज्य शासनाने यापूर्वीच दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त यापूर्वी प्राप्त झाला आहे.
त्यामुळे प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. भूसंपादन करताना जागेबरोबरच घरे, झाडे, विहीरी, फळबागा यांचे मूल्यांकन स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विमानतळासाठी तीन हजार एकर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. तर बाधित शेतकऱ्यांनी यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे संमतीपत्रे सादर केली आहेत.
भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत थेट बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.
अधिक वाचा: एप्रिल ते सप्टेंबर महिन्याच्या लाईट बिलात अजून १५ टक्के सवलत; वाचा कुणाला मिळणार लाभ?
