Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाची आंबा पार्सल सेवा; रत्नागिरीचा हापूस आता बागेतून थेट घरपोच डिलिव्हरी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 16:08 IST

indian post mango parcel गेल्या वर्षापासून देशात आणि परदेशातही रत्नागिरीचा हापूस घरपोच करण्याची सेवाही उपलब्ध झाली आहे. थेट बागेतूनही आंबावारी केली जात आहे.

रत्नागिरी : इंटरनेट आणि ई-मेलच्या युगातही भारतीय डाक विभागाने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवत अलीकडच्या काळात अधिक हायटेक झाले आहे.

टपाल आणि पार्सल सेवा यात अग्रेसर असलेल्या पोस्टाने या सेवेत व्यावसायिकतेच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल केले आहेत.

याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षापासून देशात आणि परदेशातही रत्नागिरीचा हापूस घरपोच करण्याची सेवाही उपलब्ध झाली आहे.

थेट बागेतूनही आंबावारी केली जात आहे, अशी माहिती येथील डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि. ९) पत्रकारांना दिली.

१ ऑक्टोबर २०२५ पासून इंडिया पोस्टने नोंदणीकृत पत्र आणि स्पीड पोस्ट सेवांचे एकत्रीकरण करून टपाल व्यवस्था अधिक सुव्यवस्थित केली आहे.

या बदलामुळे ग्राहकांना आता अधिक जलद सेवा उपलब्ध होत आहे. पोस्टाच्या येथील विभागाने गेल्या वर्षापासून देशात तसेच परदेशात आंब्याची पार्सल सेवा सुरू केली आहे.

गेल्या हंगामात सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांमध्ये १,६६७ डझन आंबे ८६२ बॉक्समधून घरपोच केले होते. यंदाही पोस्टाने घरपोच आंबा पार्सल सेवा सुरू केली आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ४० बागायतदारांनी ५०० डझन आंब्यांची नोंदणी केली असून, शेतकरी ते थेट ग्राहक असा उद्देश ठेवून प्रत्यक्ष बागेतून संकलित केले जात आहेत.

या आठवड्यात या आंब्यांचे वितरण पोस्टाच्या पार्सल सेवेमार्फत सांगली, कोल्हापूर, कराड येथे होणार आहे लवकरच मुंबई, पुणे आदी शहरांमध्येही आंबा पार्सल सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले.

आंब्याची घरपोच सेवा केवळ देशातच नव्हे तर परदेशातही करता येणार आहे. देशात किंवा परदेशात जाणारा आंबा पाठविताना पोस्टाकडून विशेष खबरदारीही घेतली जाते.

आंबा घेताना तो किमान आठ दिवस टिकेल, असाच घेतला जातो. त्यामुळे घरपोच होताना तो सुस्थितीत जातो, असेही ज्ञानेश कुलकर्णी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही लक्षणीय कामगिरी◼️ भारतीय टपाल विभाग आता केवळ देशातच नव्हे, तर सातासमुद्रापार आपली सेवा विस्तारली आहे.◼️ रत्नागिरी विभागाने युरोपमधील टपाल आता अवघ्या ५ ते ६ दिवसांत पोहोचवले आहे.◼️ गत आर्थिक वर्षात २१४ आंतरराष्ट्रीय टपाल बुक करून मोठा महसूल मिळवला आहे.◼️ पोस्टाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पार्सल, एक्स्प्रेस पार्सल आणि कॅश ऑन डिलिव्हरी आदी सेवा अगदी किफायशीर दराने मिळत असल्याने या सेवांना ग्राहकांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे.

अधिक वाचा: यंदा दुष्काळाची शक्यता; वाचा मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलेला पहिला दीर्घकालीन अंदाज

English
हिंदी सारांश
Web Title : Ratnagiri Hapus Mangoes: Postal Service Delivers Directly from Farms to Homes.

Web Summary : India Post delivers Ratnagiri's Hapus mangoes directly from farms. The postal service has partnered with farmers to deliver mangoes across India and even internationally. Over 500 dozen mangoes registered from 40 orchards, ensuring fresh delivery. International postal service also expanded significantly.
टॅग्स :आंबारत्नागिरीहापूस आंबापोस्ट ऑफिसऑनलाइनपुणेकोल्हापूरकराडसांगलीमुंबईशेतकरी