Lokmat Agro >शेतशिवार > Pik Spardha : खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर; विजेते शेतकरी कोण?

Pik Spardha : खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर; विजेते शेतकरी कोण?

Pik Spardha : State-level results of Kharif season 2024 crop competition announced; Who is the winning farmer? | Pik Spardha : खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर; विजेते शेतकरी कोण?

Pik Spardha : खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल जाहीर; विजेते शेतकरी कोण?

Pik Spardha Nikal कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल नुकताच जाहीर केला असून भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे.

Pik Spardha Nikal कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल नुकताच जाहीर केला असून भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल नुकताच जाहीर केला असून भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे.

ज्वारी, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांची उत्पादकता घटली आहे. यंदा भात पिकात सर्वसाधारण गटात तिन्ही पारितोषिके कोल्हापूरच्या तर आदिवासी गटात पहिली दोन पारितोषिके पुणे जिल्ह्यातील पटकावली आहेत.

सोयाबीन पिकात सांगली जिल्ह्याचे शेतकरी अव्वल ठरले तर आदिवासी गटात नांदेड जिल्ह्याचे प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भात पिकात कोल्हापूर अव्वल
-
कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल समितीने घोषित केला.
- भात पिकामध्ये सर्वसाधारण गटात भात पिकामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने पहिले तीनही क्रमांक पटकावले आहेत.
- आदिवासी गटातून दिग्गद गावचे (ता. आंबेगाव) सुरेश विरणक यांनी २५.६६ क्विंटल उत्पादन घेत पहिला तर खडकुंब्रचे (ता. जुन्नर) सुदाम सरोगदे यांनी ८३.२४ क्विंटल उत्पादन घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे.

प्रथम क्रमांक मिळालेले शेतकरी

पीक सर्वसाधारण गटआदिवासी गट
भातसुरेखा शेणवी (कोल्हापूर)सुरेश विरणक (पुणे)
ज्वारीवसंत शिंदे (जळगाव)कागड्या नाईक (नंदुरबार)
बाजरीशिवाजी चोपडे (सातारा)सोमनाथ माळी (अहिल्यानगर)
नाचणीसुरेश चांदेकर (कोल्हापूर)प्रकाश निरगुडा (रायगड)
मकासोपान करांडे (सोलापूर)कौतिक चौरे (नाशिक)
तूरगोपाळ पाचकवडे (सोलापूर)अमित कुकडे (अमरावती)
मूगऔंदुबर ढवळे (धाराशिव)-
उडीदचंद्रकांत कोरे (सोलापूर)रमेश पवार (नाशिक)

अधिक वाचा: पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील २ दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Web Title: Pik Spardha : State-level results of Kharif season 2024 crop competition announced; Who is the winning farmer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.