पुणे : दीड महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तब्बल २३ लाख ७० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यात ऑगस्टमधील नुकसान १४ लाख ४४ हजार हेक्टर तर १८ सप्टेंबरपर्यंत ९ लाख २५ हजार हेक्टरवरील शेतीला फटका बसला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे डोळे आता नुकसान भरपाईकडे लागले आहेत.
ऑगस्टमधील नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली असली तरी पावसामुळे अडथळे येत आहेत. पाऊस थांबल्यानंतर पंचनामे होतील, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
राज्यात गेल्या दीड महिन्यापासून वेगवेगळ्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. एकट्या ऑगस्टमध्ये १४ लाख ४४ हजार ६४१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
पुरामुळे पिके वाहून गेली
◼️ सप्टेंबर महिन्यात पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी होता. मात्र, त्यांनतर १४ सप्टेंबरपासून अनेक जिल्ह्यांत विशेषतः मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यात आतापर्यंत २ लाख २५ हजार ८७५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांत पुरामुळे पिके वाहून गेलीपिके वाहून गेली आहेत.
◼️ सोयाबीनसारख्या पिकांची काढणी काही दिवसांत झाली असती मात्र, या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. अन्य पिकांचीही हीच स्थिती आहे. सर्वाधिक २ लाख ६७ हजार ८१८ हेक्टरचे नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे.
आतापर्यंतचे पिकांचे झालेले नुकसान (हेक्टरमध्ये)
जिल्हा | ऑगस्ट | सप्टेंबर
बुलढाणा | ८९७७८ | ५८५२४
अमरावती | ३३३३२ | २६७३
वाशिम | १५१२९० | ३८५४१
यवतमाळ | १६४९६२ | ००
अकोला | ७२७३८ | ००
नागपूर | ११०० | ००
चंद्रपूर | ४३२४ | १४८६
वर्धा | १४१८ | २२९६०
गडचिरोली | ४८८ | ००
सोलापूर | ४७२६६ | १३३६७६
अहिल्यानगर | २९४ | १२६५५३
पुणे | ०० | २७३
सांगली | ४९७२ | ००
सातारा | ३४ | ००
कोल्हापूर | ९३७९ | ००
नाशिक | ६०७३ | ००
धुळे | २३ | ००
जळगाव | १४७१८ | ००
नंदुरबार | २३४ | ००
रत्नागिरी | १०१ | ००
रायगड | ७७ | ००
सिंधुदुर्ग | ४ | ००
नांदेड | ६२०५६६ | ००
हिंगोली | ४०००० | ००
परभणी | २०२२५ ५६८३६
संभाजीनगर | २०७४ | ००
जालना | ५१७८ | ९३८१८
बीड | २९१३६ | २६७८१८
धाराशिव | १५०७५३ | ६८७५
लातूर | १० | ००
एकूण | १४४४६४१ | ९२५८७५
एकूण | २३७०५१६
अधिक वाचा: ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट?