Lokmat Agro >शेतशिवार > तिनही हंगामात येणारा तिळाचा नवीन वाण आला; परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन

तिनही हंगामात येणारा तिळाचा नवीन वाण आला; परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन

New sesame variety available in all three seasons; Parbhani Agricultural University research | तिनही हंगामात येणारा तिळाचा नवीन वाण आला; परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन

तिनही हंगामात येणारा तिळाचा नवीन वाण आला; परभणी कृषी विद्यापीठाचे संशोधन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या टीएलटी-१० या उत्कृष्ट तीळ वाणाला केंद्र सरकारकडून क्षेत्रवाढीस देशपातळीवर अधिकृत मान्यता मिळाली आहे.

केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या बैठकीत बैठकीत मान्यता मिळाली आहे. या यशाद्वारे केंद्राने सातत्याने उत्कृष्ट कार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

ही मान्यता मिळाल्यामुळे टीएलटी-१० वाणास खरीप तसेच रब्बी/उन्हाळी हंगामात लागवडीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा (झोन-१) मध्ये लागवड करू शकतात.

तसेच गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील तेलंगणा भाग या राज्यांतही (झोन-३) खरीप हंगामात लागवडीसाठी मान्यता देण्यात आली आहे. या वाणाला ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचित करण्यात आले होते.

या संशोधनामागेविद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. डॉ. इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन असून, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे आणि इतर शास्त्रज्ञांचे योगदान मोलाचे आहे.

माननीय कुलगुरूंनी सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत टीएलटी-१० वाणामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम आणि गुणवत्तापूर्ण तीळ उत्पादनाची संधी मिळणार असून देशातील तीळ उत्पादनात आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होवून एक नवा अध्याय सुरू होईल, असे प्रतिपादन केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनीदेखील टीमचे अभिनंदन करत सांगितले की, या नव्या वाणाचा प्रसार प्रभावीपणे करण्याचा विद्यापीठाचा संकल्प असून, या वाणाचे बियाणे लवकरच देशभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

टीएलटी-१० वाणाचे वैशिष्ट्ये
- टीएलटी-१० वाण ९०-९५ दिवसांत परिपक्व होतो.
- हा वाण ७ ते ८ क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन देतो.
- या वाणामध्ये ४५.२%  इतके तेलाचे प्रमाण आहे.
- हा वाण मँक्रोफोमीना, मुळ व खोडकूज, फायलोडी यांसारख्या सहनशील आहे.
- तसेच पाने गुंडाळणारी व बोंड पोखरणारी अळी यांसारख्या किडींवर सहनशील आहे.

अधिक वाचा: निंबोळी अर्कासाठी कशी कराल निंबोळ्याची वाळवण व साठवणूक; वाचा सविस्तर

Web Title: New sesame variety available in all three seasons; Parbhani Agricultural University research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.