कोल्हापूर : राज्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी संपला असून, आतापर्यंत ५ कोटी १५ लाख टनांचे गाळप पूर्ण झाले आहे.
हे गाळप गेल्या वर्षीच्या तुलनेत १ कोटी ८२ लाख टनाने अधिक आहे. सरासरी गाळपात पुणे विभाग आघाडीवर असला तरी साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी कायम ठेवली आहे.
यंदा परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहिल्याने बहुतांश साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाला. मात्र, त्यानंतर गेले दोन महिने पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम सुरू आहे.
आतापर्यंत १९३ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ५ कोटी १५ लाख ३० हजार टन गाळप केले आहे. गेल्या वर्षी याच तारखेला ३ कोटी ३३ लाख २० हजार टन गाळप झाले होते.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा दोन कारखान्यांनी हंगाम घेतलेला नाही. राज्याचा साखर उतारा ८.६९ टक्के आहे. मात्र, उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून, सरासरी उतारा १०.३९ टक्के आहे.
विभागनिहाय उसाचे गाळप टनात, साखर उतारा टक्केमध्ये
| विभाग | कारखाने | गाळप | साखर उतारा |
|---|---|---|---|
| पुणे | ३० | १ कोटी २४ लाख | ८.९३ |
| कोल्हापूर | ३७ | १ कोटी १४ लाख | १०.२३ |
| सोलापूर | ४३ | १ कोटी ७ लाख | ७.८१ |
| आहिल्यानगर | २६ | ६२ लाख ९६ हजार | ८.१७ |
| नांदेड | २९ | ५२ लाख ११ हजार | ८.४८ |
| संभाजीनगर | २२ | ४९ लाख | ७.३३ |
| अमरावती | ०४ | ५ लाख ५५ हजार | ८.५८ |
| नागपूर | ०२ | १६ हजार | ६.८८ |
| एकूण | १९३ | ५ कोटी १५ लाख | ८.६९ |
अधिक वाचा: एफआरपीनुसार शेतकऱ्यांची बिले देताना साखर कारखान्यांचे गणित कशामुळे बिघडतंय; वाचा सविस्तर
