माळेगाव : चालू गळीत हंगामासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सोमेश्वरच्या धर्तीवर प्रतिटन ३३०० रुपये इतकी पहिली उचल जाहीर केली आहे.
सोमेश्वरनंतरही ही उचल जिल्ह्यातील सर्वाधिक ठरणार आहे. माळेगाव कारखान्याचा पहिला उचलदर आणि अंतिम दर राज्यभरातील साखर उद्योगात महत्त्वाचा मानला जातो.
सातारा, सांगली, कोल्हापूर या उच्च उतारा जिल्ह्यांत यावर्षी शेतकरी संघटनांच्या दबावानंतर ३५०० ते ३६०० रुपये प्रतिटन असा ट्रेंड तयार झाला होता.
जिल्ह्यात उतारा तुलनेने कमी असल्याने शेतकऱ्यांना या दरापेक्षा १००-२०० रुपये कमी मिळतील असे अपेक्षित होते. मात्र सोमेश्वरने प्रतिटन ३३०० रुपयांची उचल देत जिल्ह्याचा उच्चांकी दर जाहीर केला.
अधिक वाचा: सोलापूर जिल्ह्यातील 'या' १९ कारखान्यांचे ऊस दर जाहीर; कोणत्या कारखान्याने दिला सर्वाधिक दर?
