Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > दुग्ध विकास योजना : अर्ज मंजुरी सुरू; तुमचा अर्ज मंजूर झाला कि नाही, जिल्हानिहाय लाभार्थी यादी पहा

दुग्ध विकास योजना : अर्ज मंजुरी सुरू; तुमचा अर्ज मंजूर झाला कि नाही, जिल्हानिहाय लाभार्थी यादी पहा

Latest news Milk Development Scheme Application approval started Check district-wise beneficiary list | दुग्ध विकास योजना : अर्ज मंजुरी सुरू; तुमचा अर्ज मंजूर झाला कि नाही, जिल्हानिहाय लाभार्थी यादी पहा

दुग्ध विकास योजना : अर्ज मंजुरी सुरू; तुमचा अर्ज मंजूर झाला कि नाही, जिल्हानिहाय लाभार्थी यादी पहा

VMDDP Scheme : आपण केलेला अर्ज मंजूर झालेला आहे का किंवा त्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे, हे सोप्या पद्धतीने पहा..

VMDDP Scheme : आपण केलेला अर्ज मंजूर झालेला आहे का किंवा त्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे, हे सोप्या पद्धतीने पहा..

VMDDP Scheme :    दुग्धविकास योजनेला चालना देण्यासाठी १९ जिल्ह्यातील १९२ तालुक्यांमधील २४ हजार ६५७ गावांमध्ये विदर्भमराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

या अंतर्गत करण्यात आलेले अर्जांना मंजुरी देण्यास सुरुवात झाली आहे. आपण केलेला अर्ज मंजूर झालेला आहे का किंवा त्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे किंवा या योजनेची लाभार्थी यादी कशी तपासायची हे आज समजून घेऊयात...

अशी आहे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया 

  • सर्वप्रथम राज्य शासनाच्या व्हीएमडीडीपी विदर्भमराठवाडा दुग्धविकास प्रकल्प यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. 
  • पोर्टलवर आल्यानंतर या ठिकाणी मुख्यत्वे दोन पर्याय दिसून येतात. यामध्ये आता नोंदणी करा आणि अर्जाचा मागोवा घ्या. 
  • आपल्याला आजची सद्यस्थिती तपासायची असल्याने अर्जाचा मागवा घ्या या पर्यायावर क्लिक करा. 
  • या ठिकाणी मोबाईल नंबर किंवा अर्ज आयडी द्वारे लॉगिन करता येईल. 
  • लॉग इन केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती पाहता येईल. 
  • त्यामध्ये सबमिटेड अप, Approved By DPO,  Final Seletion असे तीन टप्पे दिसून येतील. 
  • त्यानुसार आपल्या लक्षात येईल की आपला अर्ज सध्या कुठल्या टप्प्यावर आहे. 
  • त्यानंतर जर तुम्हाला जिल्हानिहाय पाहिजे असेल तर वर दिलेल्या लाभार्थी या पर्यायावर क्लिक करा. 
  • या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जिल्ह्याद्वारे फिल्टर करा आणि घटकावर द्वारे फिल्टर करा, असे पर्याय दिसून येतील.
  • यातील तुम्हाला हवा असलेला जिल्हा आणि घटक निवडून प्रलंबित, मंजूर, निवडले गेलेले आणि नाकारले गेलेले अर्ज पाहता येतील. 
  • संबंधित शेतकऱ्यांची नावं देखील आपल्याला पाहता येतील. अशा पद्धतीने विकास प्रकल्प योजनेचे अर्ज मंजुरी सुरू झाले असून लाभार्थी यादी सुद्धा पाहता येणार आहे.

 

Tur Kharedi : तूर हमीभाव खरेदी उत्पादकता मर्यादा जाहीर; पहा 34 जिल्ह्यांची मर्यादा आकडेवारी

 

Web Title : दुग्ध विकास योजना: आवेदन स्वीकृत होना शुरू; जिलेवार लाभार्थी सूची देखें।

Web Summary : विदर्भ मराठवाड़ा दुग्ध विकास परियोजना के तहत आवेदन स्वीकृत होना शुरू हो गए हैं। मोबाइल नंबर या एप्लिकेशन आईडी का उपयोग करके आधिकारिक वेबसाइट पर एप्लिकेशन की स्थिति और लाभार्थी सूची ऑनलाइन देखें। जिलेवार सूची में स्वीकृत, अस्वीकृत आवेदन और किसानों के नाम शामिल हैं।

Web Title : Dairy Development Scheme: Application approvals begin; Check beneficiary list district-wise.

Web Summary : Vidarbha Marathwada Dairy Development Project application approvals started. Check application status and beneficiary lists online via the official website using mobile number or application ID. District-wise lists show approved, rejected applications and farmer names.