Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास आता पिक विमा योजनेतून मदत मिळणार; काय आहे निर्णय?

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास आता पिक विमा योजनेतून मदत मिळणार; काय आहे निर्णय?

If crops are damaged by wild animals, now you will get help from the crop insurance scheme; What is the decision? | वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास आता पिक विमा योजनेतून मदत मिळणार; काय आहे निर्णय?

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान झाल्यास आता पिक विमा योजनेतून मदत मिळणार; काय आहे निर्णय?

pik vima yojana latest update भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होते.

pik vima yojana latest update भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होते.

नवी दिल्ली : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांनी होणारे पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाणार आहे. हे नुकसान २०२६ च्या खरीप हंगामापासून मिळेल.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मुसळधार पाऊस व पुरामुळे भात पिके पाण्याखाली गेल्यास झालेले नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केले जाईल.

कोण करते नुकसान?
◼️ भारतातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्ती, रानडुक्कर, नीलगाय, हरीण आणि माकडे यांसारख्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होते.
◼️ आता या नुकसानीला स्थानिक जोखीम श्रेणी अंतर्गत पाचवा अतिरिक्त विमा कव्हर म्हणून ओळखले जाईल. त्याचा लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.

या राज्यांना फायदा
या विम्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि उत्तराखंड यासारख्या राज्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांच्या दाव्यांचा तत्काळ निपटारा होईल.

शेतकऱ्यांना ७२ तासांत हे मात्र करावे लागणार.
◼️ राज्य सरकारांना नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या वन्य प्राण्यांची यादी जाहीर करणे, तसेच आधीच्या डेटाच्या आधारे असुरक्षित जिल्हे ओळखावे लागतील.
◼️ शेतकऱ्यांना जिओटेंग केलेले छायाचित्र अपलोड करून पीक विमा अ‍ॅप वापरून ७२ तासांच्या आत नुकसान नोंदवावे लागेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. अनेक राज्यांनी या विम्याची मागणी केली होती.

भात पिक पाण्याखाली गेल्यास
◼️ प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत भातपिके पाण्याखाली जाण्याच्या नुकसानीसाठी स्थानिक स्वरुपातील आपत्तीपासूनचे विमा कवच पुन्हा लागू केल्याने विशेषतः किनारपट्टीलगतच्या भागातील आणि पूरप्रवण राज्यांतील शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.
◼️ विशेषतः ओडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या राज्यात भातपिके पाण्याखाली जाणे ही नियमित समस्या झाली आहे. अशा राज्यांतील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ मिळू शकणार आहे.

तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानाचाही समावेश करण्यात आल्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक समावेशक, प्रतिसादात्मक आणि शेतकरीस्नेही बनली आहे.

अधिक वाचा: पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

Web Title: If crops are damaged by wild animals, now you will get help from the crop insurance scheme; What is the decision?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.