Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अखेर आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर; हेक्टरी किती रुपये मिळणार? वाचा सविस्तर

अखेर आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर; हेक्टरी किती रुपये मिळणार? वाचा सविस्तर

Finally, aid announced for mango and cashew farmers; How much will they get per hectare? Read in detail | अखेर आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर; हेक्टरी किती रुपये मिळणार? वाचा सविस्तर

अखेर आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत जाहीर; हेक्टरी किती रुपये मिळणार? वाचा सविस्तर

amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.

amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.

मुंबई : हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातीलआंबा आणि काजू उत्पादकांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.

फळपीक उत्पादकांनी विमा काढला आहे त्यांना जास्त मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले. वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजूला कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे.

क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवला असून सकृतदर्शनी फळबागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.

कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात १ लाख २४ हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. तर काजू पिकाखाली १ लाख ७५ हजार १४० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे.

मागील वेळी आपण आंबा आणि काजू उत्पादकांना १५ हजार हेक्टरी मदत दिली होती, यावेळी ती हेक्टरी २२ हजार रुपये केली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

अंतिम आठवडा प्रस्तावासह अन्य प्रस्तावांवर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आंबा आणि काजूसह धान उत्पादकांनाही बोनस देण्यात येईल त्यासंबंधीची कार्यपद्धती निश्चित करण्यात येत असल्याचे सांगितले.

अधिक वाचा: रॉकेल वाटपाचा जीआर आला; एका रेशन कार्डवर नक्की किती रॉकेल मिळणार? वाचा सविस्तर

Web Title : आम, काजू किसानों के लिए राहत: सरकार ने प्रति हेक्टेयर सहायता की घोषणा की

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने जलवायु परिवर्तन से प्रभावित कोंकण के आम और काजू किसानों के लिए ₹22,000 प्रति हेक्टेयर सहायता की घोषणा की। बीमा वाले किसानों को अधिक सहायता मिलेगी। यह निर्णय पालघर, ठाणे, रायगढ़, रत्नागिरी और सिंधुदुर्ग जिलों में मौसम के कारण फल उत्पादन में कमी की रिपोर्ट के बाद लिया गया है।

Web Title : Relief for Mango, Cashew Farmers: Government Announces Per Hectare Aid

Web Summary : Maharashtra government declared ₹22,000 per hectare aid for mango and cashew farmers in Konkan affected by climate change. Farmers with insurance will receive more assistance. The decision follows reports of reduced fruit production due to weather variations in Palghar, Thane, Raigad, Ratnagiri, and Sindhudurg districts.