Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी बांधवांनो 'हे' ॲप इन्स्टॉल करा अन् हवामानाचा अचूक अंदाज घेत पिकाची हानी टाळा

शेतकरी बांधवांनो 'हे' ॲप इन्स्टॉल करा अन् हवामानाचा अचूक अंदाज घेत पिकाची हानी टाळा

Farmers, install this app and avoid crop damage by accurately predicting the weather. | शेतकरी बांधवांनो 'हे' ॲप इन्स्टॉल करा अन् हवामानाचा अचूक अंदाज घेत पिकाची हानी टाळा

शेतकरी बांधवांनो 'हे' ॲप इन्स्टॉल करा अन् हवामानाचा अचूक अंदाज घेत पिकाची हानी टाळा

Meghdoot App : बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हवामानाची अचूक व तात्काळ माहिती मिळाल्यास शेतीचे नियोजन वेळेत होऊन नुकसान टाळता येऊ शकते. या गरजेची जाणीव लक्षात घेऊन भारतीय कृषी विभाग आणि भारतीय हवामान विभागाने एकत्रितपणे 'मेघदूत' हे मोबाइल ॲप तयार केले आहे.

Meghdoot App : बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हवामानाची अचूक व तात्काळ माहिती मिळाल्यास शेतीचे नियोजन वेळेत होऊन नुकसान टाळता येऊ शकते. या गरजेची जाणीव लक्षात घेऊन भारतीय कृषी विभाग आणि भारतीय हवामान विभागाने एकत्रितपणे 'मेघदूत' हे मोबाइल ॲप तयार केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारतीय शेती ही मुख्यतः नैसर्गिक पावसावर अवलंबून असते. विशेषतः खरीप हंगामात पावसावर शेतकऱ्यांची मोठी भिस्त असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हवामान बदलामुळे पावसाच्या वितरणात आणि प्रमाणात मोठी अनियमितता दिसून येत आहे.

कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी पावसाची वेळच चुकीची होत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीवर गंभीर परिणाम होत आहे. या बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना हवामानाची अचूक व तात्काळ माहिती मिळाल्यास शेतीचे नियोजन वेळेत होऊन नुकसान टाळता येऊ शकते.

या गरजेची जाणीव लक्षात घेऊन भारतीय कृषी विभाग आणि भारतीय हवामान विभागाने एकत्रितपणे 'मेघदूत' हे मोबाइल ॲप तयार केले आहे. हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातील हवामानाची अद्ययावत माहिती देते, जसे की तापमान, पर्जन्यमान, आर्द्रता, वारा इत्यादी.

यासोबतच हे ॲप कृषीविषयक सल्ला, पीक संरक्षण, खतांचा योग्य वापर आणि सिंचन नियोजनासंबंधी मार्गदर्शनही करते. 'मेघदूत' ॲपमुळे शेतकऱ्यांना हवामानाशी निगडीत पूर्वसूचना मिळू शकते आणि त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शेतीतील धोके कमी करू शकतात. त्यामुळे हे ॲप शाश्वत शेतीकडे वाटचाल करणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

मेघदूत ॲप नेमकं काय ?

शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि त्या आधारीत पीक सल्ला देण्याचं काम मेघदूत ॲपमधून केलं जाते. शेतकऱ्यांना मेघदूत ॲपद्वारे वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील आर्द्रता, तापमान आणि पावसाच्या अंदाजाची माहिती दिली जाते. याशिवाय ॲपद्वारे पिकाची माहिती दिली जाते.

ॲप मराठी भाषेत आहे का?

मेघदूत ॲप भारतातील १० प्रादेशिक भाषांमध्ये वापरता येते. भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र आणि भारतीय कृषी परिषदेकडून हेॲप विकसित करण्यात आले आहे. मराठी भाषेमध्ये हे अॅप वापरता येते.

मेघदूत ॲप कसं वापरायचं ?

शेतकऱ्यांना प्रथम गुगल प्लेस्टोरवरून मेघदूत ॲप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर नोंदणीवर क्लिक करा, तिथे शेतकऱ्यांनी त्यांचं नाव, मोबाईल नंबर, ॲपची भाषा, जिल्हा आदी माहिती भरावी. त्यानंतर शेतकऱ्यांना मेघदूत अॅपवरून पाऊस, वारे, तापमान, पीक सल्ला मिळवता येईल. मेघदूत ॲप देशभरात वापरता येणार आहे

मेघदूत ॲप नेमकं काय?

गेल्या काही वर्षांमध्ये तर वर्षातील १२ महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्यात पाऊस पडल्याची उदाहरण आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाने शेतकऱ्याला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे पिकांची हानी होतेच तर कधी कथी जीवितहानीदेखील होती. जनावरांचे देखील प्राण जातात. हे सर्व टाळण्यासाठी मेघदूत ॲप सहाय्यकारी ठरणार आहे. हे ॲप दर मंगळवारी आणि शुक्रवारी अपडेट केलं जातं.

सहज होते डाऊनलोड

शेतकऱ्यांना सहजरित्या डाऊनलोड करुन घेणारे हे ॲप असल्याची माहिती देण्यात आली आहे.

'स्कायमेटवेदर'वर जा, उपग्रह प्रतिमा पाहा

अद्ययावत अशा या ॲपवर हवामान खात्याच्या अधिकृत अकाउंटवरील सर्व माहिती अत्यंत तात्काळ उपलब्ध होते

हेही वाचा : शेतकऱ्यांना लुटतोय शेतकऱ्यांचाच लेक? व्यवस्थेच्या पुढे हतबल शेतीमातीतील व्यथा 

Web Title: Farmers, install this app and avoid crop damage by accurately predicting the weather.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.