Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रब्बीच्या कांदा लागवडीसाठी रोपांच्या मागणीत मोठी वाढ; रोपांना मिळतोय कांद्यापेक्षा अधिक भाव

रब्बीच्या कांदा लागवडीसाठी रोपांच्या मागणीत मोठी वाढ; रोपांना मिळतोय कांद्यापेक्षा अधिक भाव

Demand for seedlings for Rabi onion cultivation has increased significantly; seedlings are fetching higher prices than onions | रब्बीच्या कांदा लागवडीसाठी रोपांच्या मागणीत मोठी वाढ; रोपांना मिळतोय कांद्यापेक्षा अधिक भाव

रब्बीच्या कांदा लागवडीसाठी रोपांच्या मागणीत मोठी वाढ; रोपांना मिळतोय कांद्यापेक्षा अधिक भाव

यंदा कांदा लागवड खर्चिक ठरत असली, तरी चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून बाजारात विक्री करत आहेत.

यंदा कांदा लागवड खर्चिक ठरत असली, तरी चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून बाजारात विक्री करत आहेत.

अवसरी : रब्बी हंगाम कांदा पिकासाठी पोषक ठरत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शेतकरी सध्या कांदा लागवडीत व्यस्त झाले आहेत.

मेंगडेवाडी, निरगुडसर, लोणी, धामणी, जारकरवाडी, लाखणगाव, काठापूर बुद्रक, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळूजनगर, रानमळा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड सुरू आहे.

लागवडीसाठी मजुरांची कमतरता असतानाही शेतकरी सावड पद्धतीने किंवा उपलब्ध मजुरांच्या मदतीने लागवड उरकून घेत आहेत. कांद्याच्या बाजारभावात सातत्याने चढ-उतार होत असले, तरी शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे.

सध्या बाजारात कांदा प्रतिकिलो २६ ते २७ रुपये दराने विकला जात असून, शेतकऱ्यांकडे कांद्याची आवक कमी असल्याने भाव टिकून आहेत.

याचा थेट परिणाम कांदा रोपांवर झाला असून, रोपांना कांद्यापेक्षा अधिक भाव मिळत आहे. एक एकर कांदा लागवडीसाठी लागणाऱ्या रोपांसाठी शेतकऱ्यांना १५ ते २० हजार रुपये मोजावे लागत आहेत.

त्यामुळे यंदा कांदा लागवड खर्चिक ठरत असली, तरी चांगल्या बाजारभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. तालुक्यातील अनेक अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून बाजारात विक्री करत आहेत.

मात्र बदलत्या हवामानाचा फटका रोपांना बसल्याने काही शेतकऱ्यांची रोपे पाडक झाली, तर काहींची रोपे चांगली उतरली आहेत. तरीही सध्या कांदा रोपांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने रोपांना चांगला दर मिळत आहे.

रोप उत्पादक शेतकऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर ठरत आहे. सध्या कांदा लागवडीसाठी मजुरांना प्रतिदिन सुमारे ४०० रुपये मजुरी द्यावी लागत असून, बाहेरगावाहून मजूर आल्यास गाडीभाडे व जेवणासाठी १५० ते २०० रुपये अतिरिक्त खर्च येत आहे.

साधारण एक एकर कांदा लागवडीसाठी १६ मजुरांची गरज भासते. त्यामुळे लागवडीचा खर्च वाढला असला, तरी बाजारभाव चांगला मिळाल्यास तो खर्च निघेल, अन्यथा आर्थिक फटका सहन करावा लागेल असे मत शेतकरी म्हणतात.

एक एकर लागवडीसाठी १६ मजूर
मजुरांना प्रतिदिन सुमारे ४०० रुपये मजुरी द्यावी लागत असून, बाहेरगावाहून मजूर आल्यास गाडीभाडे व जेवणासाठी १५० ते २०० रुपये अतिरिक्त खर्च येत आहे.

कांदा २७० रुपये १० किलो
◼️ सध्या कांद्याची टंचाई असल्याने दहा किलोस २६० ते २७० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे कांद्याबरोबरच रोपांनाही सुगीचे दिवस आले आहेत.
◼️ डिसेंबर अखेरपर्यंत कांद्याचे भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती कांदा उत्पादक शेतकरी व पोलिस पाटील संदीप आढाव (लोणी) यांनी दिली.

अधिक वाचा: राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्जाची मर्यादा वाढवली; आता हेक्टरी किती मिळणार कर्ज?

Web Title : प्याज के पौधों की मांग बढ़ी; प्याज से महंगा पौधा।

Web Summary : अंबेगांव के किसान रबी प्याज लगाने में व्यस्त हैं। पौधों की मांग अधिक है, जिसकी लागत ₹15,000-₹20,000/एकड़ है, जो प्याज की कीमतों से अधिक है। श्रम लागत ₹400/दिन प्लस परिवहन है। प्याज की कीमतें ₹26-₹27/किलो हैं, जो दिसंबर तक स्थिर रहने की उम्मीद है।

Web Title : Demand surges for onion seedlings; seedlings pricier than onions.

Web Summary : Ambegao farmers busy planting Rabi onions. Seedling demand is high, costing ₹15,000-₹20,000/acre, exceeding onion prices. Labor costs ₹400/day plus transport. Onion prices are ₹26-₹27/kg, expected to remain stable till December.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.