Join us

जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई आली; कोणत्या विभागाला किती मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 08:45 IST

Ativrushti Nuksan Bharpai जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसान झाले होते.

जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसानीपोटी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

जुलै-ऑगस्टमध्ये नुकसानीची भरपाईअमरावती विभागअमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांतील ७,८८,९७४ शेतकऱ्यांच्या ६,५४,५२५.४२ हेक्टरवरील नुकसानीपोटी ५६५ कोटी ६० लाख ३० हजारांच्या मदतीस मान्यता.नागपूर विभागगोंदिया, भंडारा, वर्धा गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील ३७,६३१ शेतकऱ्यांच्या २१,२२४.६४ हेक्टरवरील नुकसानीपोटी २३ कोटी ८५ लाख २६ हजारांच्या मदतीस मान्यता.

पुणे विभागकोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांच्या ८ हजार ८३५.१५ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १४ कोटी २८ लाख ५२ हजारांच्या मदतीस मान्यता.

छ. संभाजीनगर विभागहिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील १० लाख ३५ हजार ६८ शेतकऱ्यांच्या ८ लाख ४८ हजार ४४५.३७ हेक्टरवरील नुकसानीपोटी ७२१ कोटी ९७ लाख ८६ हजारांच्या मदतीस मान्यता.

नाशिक विभागनाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व अहिल्यानगर जिल्ह्यांतील २४ हजार ६७७ शेतकऱ्यांच्या १२ हजार १४९.४६ हेक्टरवरील शेत पिकाच्या नुकसानीपोटी १३ कोटी ७७ लाख ३१ हजारांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. त्यामुळे शासनस्तरावर प्रस्ताव पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही त्यांना मदत त्वरित व कार्यक्षम पद्धतीने वितरित होईल. - मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री

अधिक वाचा: स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत एकरकमी पहिल्या उचालीचा आकडा ठरला सोबत 'या' १८ ठरावांना मंजुरी; वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Compensation for crop damage due to heavy rains announced.

Web Summary : ₹1339.49 crore approved for crop damage compensation after July-August floods. 19.22 lakh farmers across Amravati, Nagpur, Pune, Chhatrapati Sambhajinagar and Nashik divisions will benefit from this initiative.
टॅग्स :शेतीशेतकरीपीकपाऊसपूरमहाराष्ट्रपुणेकोल्हापूरनाशिकअमरावतीनागपूर