Lokmat Agro >शेतशिवार > हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई

हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई

Changes in weather based fruit crop insurance scheme; now only these farmers will get compensation | हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई

हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही बदल; आता या शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसानभरपाई

fal pik vima yojana खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानभरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानीकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे.

fal pik vima yojana खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानभरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानीकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सोलापूर : खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानभरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानीकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे.

विविध जिल्ह्यांत वेगवेगळ्या फळपिकाचे केंद्र व राज्य शासन हिस्सा भरणार नाही. सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचा मृग बहारासाठी केंद्र व राज्य शासन विमा हप्ता भरणार नाही. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान खरेतर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर होते.

पेरणी झाल्यानंतर बरेच दिवस पाऊस गायब होते, पेरणी झालेल्याची वाढ सुरू असताना, बराच दिवस पाऊस विश्रांती घेतो, पिकांची चांगली वाढ होत असताना, अचानक वारे व मोठा पाऊस पीक आडवे करतो, पीक काढणीला आल्यानंतर बरेच दिवस पाऊस पडत राहिल्याने पिकांचे नुकसान होते.

अशा वेळी विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळत असायची. इंटिमेशन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून त्या पटीत विमा कंपनी नुकसानभरपाई देते.

मात्र, राज्य शासनाने नुकताच निर्णय घेतला असून, केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. यामुळे सध्या अतिवृष्टी, संततधार पावसामुळे होणाऱ्या पीक नुकसानीप्रमाणे यापुढे शेतकऱ्यांचे नुकसान मिळणार नाही.

याशिवाय हवामान आधारित फळपीक विमा योजनेतही मोठे बदल केले आहेत. २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षात मृग बहारासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.

मृग बहारात आंबिया बहारात केंद्र व राज्य शासन प्रत्येकी १५ हजार २०० रुपयांचा हिस्सा भरणार आहे. मात्र, मृग बहारात सरकार एक दमडीही भरणार नाही.

विम्याचा हप्ता केंद्र भरणार नाही
मृग बहारात अमरावती जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, लिंबू, पेरू, सिताफळ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लिंबू, पेरू, चिक्कू, सिताफळ, जालना जिल्ह्यात लिंबू, मोसंबी, डाळिंब, पेरू, परभणी जिल्ह्यात मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू, चिक्की, सिताफळ, धाराशिव जिल्ह्यात डाळिंब, मोसंबी, लिंबू, चिक्कू, पेरू, सिताफळ, यवतमाळ व हिंगोली जिल्ह्यात मोसंबी, तर आंबिया बहारात अमरावती, अकोला, परभणी, धाराशिव, नागपूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोसंबी, डाळिंबाचा विम्याचा हप्ता केंद्र व राज्य शासन भरणार नाही.

अधिक वाचा: एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना

Web Title: Changes in weather based fruit crop insurance scheme; now only these farmers will get compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.