भरत निगडे
मकर संक्रांतीच्या Makar Sankranti आदल्या दिवशी येणारा दिवस म्हणजे 'भोगी'. Bhogi भोगी मार्गशीर्ष महिन्यात येतो. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. भोगी आणि मकर संक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.
मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. त्यापैकी आज भोगी आहे. आजच्या दिवशी घरोघरी 'भोगीची भाजी व तीळ लावून बाजरीची भाकरी' करण्यात येते. या आरोग्यदायी भाजीचे वेगळे महत्त्व आहे.
जानेवारी महिन्यात शेतात पीक बहरलेले असल्याने मुबलक ताज्या भाज्या उपलब्ध असतात. या सर्व भाज्या वापरून भोगीची भाजी करतात. सूर्याचं मकर राशीत प्रवेश करणं या दिवसाला मकर संक्रांत म्हणून आपण ओळखतो.
वर्षभरात एकंदरीत १२ संक्रांत येतात. त्या सर्व संक्रांतीमधली ही संक्रांत सर्वांत महत्त्वाची मानली जाते. मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवस चालतो. भोगी, संक्रांत आणि किंक्रांत. त्यापैकी आज भोगी आहे.
सूर्याने २२ डिसेंबर रोजी उत्तरायणाला सुरुवात केली असली तरीही हवेत मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण असतो. भोगी हा सण मुख्यत्वे शेतकरी साजरा करतो.
सर्वसामान्य घरात भोगीच्या दिवशी तीळ लावलेली भाकरी, भोगीची भाजी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी यांसारखे पौष्टिक पदार्थ बनवले जातात. माणसांमध्ये आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी हा सण साजरा केला जातो.
वेगवेगळ्या प्रातांतील पद्धत आणि भोगीची भाजी
- मराठवाड्यात या भाजीला 'खेंगट' म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत.
- तामिळनाडूत हा सण 'पोंगल' व आसाममध्ये भोगली बिहू' आणि पंजाबमध्ये 'लोहिरी, राजस्थानमध्ये 'उत्तरावन' म्हणून साजरा केला जातो. या भोगी सणाच्या दिवशी विशिष्ट पदार्थ करण्याची पद्धत आहे.
- या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात.
- तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत करण्याची परंपरा आहे.
संक्रांत आणि भोगीचं नातं काय?
१) आपल्या मराठीत एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे 'जो न खाई भोगी, तो सदा रोगी'. या म्हणीद्वारे भोगीची आरोग्यवर्धक भाजी खाणे किती गरजेची आहे हे सांगितले जाते.
२) त्यामुळे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणाऱ्या भोगी सणाला बनवण्यात येणारी भोगीची भाजी खाणे खूप फायदेशीर आहे.
३) आज प्रत्येक घराघरांत विविध भाज्या एकत्र करून भोगीची भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाण्याची जुनी प्रथा आहे. पण, वैद्यकीयदृष्ट्यादेखील ही भाजी खाणे या हंगामात योग्य मानली जाते.
४) मुळात मकर संक्रांत हा सण थंडीच्या दिवसांमध्ये येतो. त्यामुळे या सर्व हंगामी भाज्या केल्याने शरीर उबदार आणि मजबूत राहण्यास मदत होऊ शकते.