अलिबाग : अलिबागमध्ये प्रसिद्ध पांढऱ्या कांद्याची लागवड यंदा पावसामुळे उशिराने होणार आहे. पावसामुळे कांद्याची बी वाया गेल्याने शेतकरीपेरणी उशिरा करत आहेत.
अलिबाग तालुक्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड होते, जिथे पांढऱ्या कांद्याची बाजारात मोठी मागणी आहे. भात कापणी उशिरा झाल्याने कांद्याची लागवडदेखील लांबली आहे.
औषधी गुणधर्म असलेला हा कांदा दरवर्षी ५-६ हजार टन उत्पादन देतो. यंदा कृषी विभागाचा उद्देश लागवड क्षेत्र २५० हेक्टरवरून वाढवून ५०० हेक्टर करण्याचा आहे; परंतु जमीन ओली असल्याने पेरणी सुरू झाली नाही.
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. तालुक्यात पाच ते सहा हजार टन पांढरा कांद्याचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांनी कांद्याचे बी पेरणी केली होती.
मात्र पावसामुळे बी वाया गेले आहे. जमीन सुकल्यानंतर पांढरा कांद्याची लागवड केली जाते. मात्र पाऊस पडल्यामुळे अद्यापही जमीन ओली आहे.
तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर लागवड
◼️ अलिबाग तालुक्यात वेश्वी, नेहुली, वाडगाव, कार्ले, तळवली, सोगाव, धोलपाडा, पवळे या गावात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते.
◼️ तालुक्यात अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते.
◼️ यंदा पावसाचा मुक्काम लांबला असल्याने भात कापणी लांबली आहे.
◼️ भात कापणी झाल्यानंतर पांढऱ्या कांद्याची लागवड शेतकरी करतात.
◼️ मात्र अवकाळी पावसाने पांढरा कांद्याची लागवड लांबणीवर पडली आहे.
क्षेत्र वाढविण्याचा कृषी विभागाचा मानस
◼️ यंदा पांढरा कांद्याचे लागवड क्षेत्र वाढविण्याचा कृषी विभागाचा मानस आहे. यासाठी गतवर्षीपासून कृषी विभागाचा प्रयत्न सुरू आहे.
◼️ दरवर्षी अडीचशे हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मात्र यंदा पाचशे हेक्टरपर्यंत लागवड क्षेत्र नेण्याचा कृषी विभागाचा मानस आहे.
◼️ मात्र यंदा लागवड लांबणीवर गेल्याने अद्याप पांढरा कांद्याची शेतात पेरणी झालेली नाही आहे. त्यामुळे शेतकरी चिंतीत असल्याचे दिसून येत आहे.
अधिक वाचा: महसूल विभागाचे नवे आदेश, आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; जाणून घ्या सविस्तर
