शेती हा माणसाचा आद्य व्यवसाय समजला जातो. अन्न, हवा, पाणी हे तीन घटक मनुष्याचे या पृथ्वीवर अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. साधारणता १० हजार वर्षांपूर्वी मानव शेती करायला लागला असे मानले जाते.
उत्क्रांतीच्या या प्रक्रियेत मानवाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. त्यापैकी अन्नाची निर्मिती ही शेती व्यवसायातून होत असते. त्यामुळे शेतीस अनन्य साधारण महत्व आहे. जो पर्यंत मानवास अन्नाची गरज आहे तो पर्यंत शेती व्यवसायास भवितव्य आहे.
कंदमुळे खावून जगणारा मानव आत सुनिता विल्यम सारखा अवकाशात सुपर फूड खावून सलग २८६ दिवस राहिला. ते केवळ मानवाने केलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे. आपण अगदी गेल्या २०० वर्षातील थोडासा इतिहासाचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की,
◼️ १८६५-६६ मध्ये ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू प्रांतात पडलेल्या दुष्काळामुळे जवळपास २० लाख लोक भूकबळी झाले. त्यातील १० लाख हे एकट्या ओरिसा प्रांतातील होते. म्हणून याला ओरिसा दुष्काळ म्हणून देखील समजले जाते.
◼️ यानंतर १८७६ ते ७८ दरम्यान तत्कालीन बॉम्बे, मद्रास, उत्तर प्रदेश, पंजाब प्रांतात पडलेल्या दुष्काळामुळे जवळपास ५० लाख लोक भूकबळी झाले.
◼️ १८७१ भारतात कृषी विभागाची स्थापना महसूल, कृषी व व्यापार विभाग एकत्रित अशी म्हणून लॉर्ड मेयो व ए.ओ. ह्यूम यांनी केली. याचा प्रमुख उद्देश मँचेस्टर येथील कापड उद्योगासाठी कापसाचा पुरवठा करणे.
◼️ १८८० मध्ये दुष्काळ आयोगाची स्थापना रिचर्ड स्ट्रेची यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. या दुष्काळ आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे व अशा आपत्तीत पुरेशी उपाययोजना करणे या उद्देशाने कृषी विभागाच्या राज्यात स्थापना झाली.
◼️ १८८३ मध्ये महाराष्ट्र राज्यात कृषी विभागाची स्थापना करण्यात आली.
◼️ मि.कटिंग हे कृषी संचालक असताना १९१५-१६ पासून मृदसंधारण कामे हाती घेण्यात आली. १९४२ मध्ये जमीन सुधारणा कायदा करण्यात आला. तर १९४३ पासून पिकांना पाणी देण्याच्या संदर्भात धोरण निश्चित करण्यात आले.
◼️ १९४३ मध्ये पश्चिम बंगाल मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात अन्नधान्याच्या कमतरतेमुळे जवळपास २५ ते ३० लाख लोक भूकबळी झाल्याचे सांगण्यात येते.
◼️ यानंतरच मग अन्नसुरक्षासाठी फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आणि अन्नधान्य उत्पादन निश्चितीसाठी पिक कापणी प्रयोग सुरुवात झाली.
पहिली हरितक्रांती
अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी १९६० साली डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली अन्नधान्य स्वयंपूर्णता मिळवण्याचे ध्येय साकार करण्यासाठी सुधारित व संकरित जातीचे बियाणे वापर, सिंचन सुविधा निर्मिती, रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर यावर भर देण्यात आला.
◼️ यात प्रथम भाताच्या आय आर-८ (International rice research institute Manila Philippines) व गहू पिकाच्या डॉ. नॉर्मल बोरलॉग संशोधित dwarf wheat varieties कल्याणसोना, सोनालिका सारख्या जातींचा वापर वाढवून पिकांचे उत्पादन वाढले.
◼️ राज्यात सुधारित व संकरित जातीचे बियाणे उत्पादनासाठी १९६६-६७ दरम्यान तालुका बीजगुण प्रक्षेत्र निर्माण करण्यात आली. त्यावर बीज उत्पादन कार्यक्रम घेण्यात आले. ज्वारी चे CSH-१ ते CHS-९ , बाजरीची संकरित बाजरा-१ सारखे संकरित वाण निर्माण करण्यात आले.
◼️ १९६५ साली शेतकरी मासिक कृषी विषयक ही आधुनिक तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्यापर्यंत नेण्यासाठी शासन मार्फत सुरू करण्यात आले. तर खासगी क्षेत्रात बळीराजा मासिक सुरु झाले.
◼️ १९६७-६८ पिक स्पर्धा, कृषी पुरस्कार सुरुवात.
◼️ सधन शेती विकास योजनेअंतर्गत जमिनीची बांध बंदिस्ती, सुधारित बियाणे मिनीकेट वाटप, पीक प्रात्यक्षिके, प्रशिक्षण, रासायनिक खतांचा, कीड नाशकांचा वापर, tractor सारख्या यंत्रांचा वापर, सिंचन सुविधा यावर भर देण्यात आला.
◼️ १९७२ मध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांधबंदिस्ती, माती नालाबांध सारखे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले.
◼️ १९७९ कृषी विस्तार साठी प्रयोगशाळा ते शेती कार्यक्रम (lab to land prog)
◼️ १९८२ मध्ये फलोद्यान विभाग स्थापन करण्यात आला.
◼️ १९८३-८४ पासून प्रशिक्षण व भेट योजना सुरू करण्यात आली.
◼️ १९८४-८५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पिक विमा योजना सुरू केली.
◼️ १९८६-८७ मध्ये ठिबक सिंचन योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली.
◼️ १९९०-९१ मध्ये रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड.
◼️ १९९२ मध्ये जलसंधारण विभागाची निर्मिती करण्यात आली.
◼️ १९९२-९३ मध्ये आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजना हाती घेण्यात आली.
◼️ १९९६ मध्ये एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास योजना माथा ते पायथा राबविण्यास सुरुवात झाली.
◼️ ०१ जुलै १९९८ मध्ये कृषी विभागाचे मृदसंधारण, फलोत्पादन, प्रशिक्षण भेट योजना हे तिन्ही विभाग एकत्र करून एक खिडकी योजना द्वारे नवीन सरंचना निर्माण करण्यात आली.
◼️ २००३ कृषी उत्पन्न बाजार समिती मॉडेल ऍक्ट.
◼️ २००५ मध्ये कृषीसाठी स्वातंत्र दैनिक वृत्तपत्र अग्रोवन सुरु.
◼️ २००५ आत्मा योजना सुरु.
◼️ २००५ राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सुरु.
◼️ २००६ मनरेगा योजना सुरु.
◼️ २००७-०८ राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरु, जमीन आरोग्य अभियान, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन योजना सुरु.
◼️ २०१३ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा.
◼️ २०१४ जलयुक्त शिवार अभियान.
◼️ २०१६ प्रधानमंत्री पिक विमा योजना.
◼️ १ एप्रिल २०१८ पासून मृद व जलसंधारण विभागाची स्थापना.
◼️ २०१८ मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना.
◼️ २०२० प्रधानमंत्री मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना (Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises (PMFME)
◼️ नोव्हेंबर २०२४ मध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) सुरू.
कृषी शिक्षण व संशोधन
◼️ १८७९ मध्ये शास्त्र शाखेंतर्गत कृषी शिक्षण सुरुवात.
◼️ १९०१ ते १९०५ दरम्यान पुसा, कानपूर, कोईमतुर, लालपुर (पाकिस्तान), नागपूर ही देशातील पहिली पाच कृषी महाविद्यालय होत.
◼️ १९०५ इंडियन एग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट की पुसा बिहार येथे स्थापना.
◼️ १९०७ मध्ये कृषी महाविद्यालय पुणे ची स्थापना झाली.
◼️ १९६० साली जी.बी. पंत कृषी विद्यापीठची पंतनगर उत्तर प्रदेश (सध्याचे उत्तराखंड) येथे स्थापना करण्यात आली.
◼️ राज्यात १९६८ ते ७२ दरम्यान चार कृषी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.
◼️ कृषी संशोधन व विस्तार कार्याने राज्याच्या शेतीचा चेहरा मोहरा बदलला.
◼️ १९६० साली १.५० लाख हेक्टर क्षेत्र असलेले ऊस आता १५ लाख हेक्टर पर्यंत गेले आहे.
◼️ १९९० मध्ये २.२० लाख हेक्टर असलेली फळबाग आता जवळपास ८ ते ९ लाख हेक्टर झाली आहे.
◼️ तर नगण्य स्वरूपात असलेला भाजीपाला क्षेत्र हे ४ लाख हेक्टर हून अधिक झाले आहे.
◼️ ज्वारीचे क्षेत्र मात्र ६६ लाख हेक्टर वरून १६ ते १७ लाख हेक्टर वर आले आहे.
◼️ सोयाबीनचे १९८० साली जवळपास निरंक असलेले क्षेत्र हे ५० लाख हेक्टर वर गेले आहे.
◼️ कापूस पिकाखाली १९६० ते २००० दरम्यान जवळपास २५ ते २६ लाख हेक्टर असलेले क्षेत्र हे बीटी कॉटन आल्यानंतर वाढून ४० लाख हेक्टर पर्यंत झाले आहे.
◼️ तर भात पिकाखाली असलेले १४ ते १५ लाख हेक्टर क्षेत्र हे कायम आहे.
◼️ मुग, उडीद, बाजरी, नागली, सुर्यफुल, भुईमुग,कारळा, करडई हे पिकाखालील क्षेत्र कमी होत गेले.
◼️ मका पिकाखाली ९ ते १० लाख हे क्षेत्र झाले आहे.
◼️ हरभरा पिकाखाली २६ ते २८ लाख हे क्षेत्र झाले आहे.
◼️ ठिबक, तुषार या सूक्ष्मसिंचन प्रणालीखाली ऊस, फळबाग, भाजीपाला, फुलशेती अंतर्गत मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आले आहे. कापूस पिकाचे देखील चांगले उत्पादन सूक्ष्म सिंचन प्रणालीवर घेतले जात आहे.
◼️ उसाच्या ४१९, ७४०, ८६०३२, २६५ या जातींनी क्रांती केली.
◼️ तर डाळिंब पिकामध्ये भगवा, आरक्ता या जातींमुळे निर्यात वाढ झाली.
◼️ द्राक्ष शेतीमध्ये चांगल्या पद्धतीने काम झाले.
◼️ कांदा, भाजीपाला निर्यातीमध्ये चांगली वृद्धी झाली.
◼️ हरितगृह, शेडनेटमध्ये फुलशेती बहरत गेली.
◼️ कांदा चाळ, packhouse , शीतगृह, गोडाऊन सुविधेमध्ये वाढ झाली.
◼️ ई-नाम अंतर्गत कृषी माल विक्री व्यवस्था सुधारली.
◼️ शेतमाल तारण कर्ज व्यवस्थेमुळे बाजारभाव स्थिर राहण्यास मदत झाली.
देशातून कृषी मालाची सर्वसाधारण निर्यात २ लाख कोटीच्या दरम्यान असून (महाराष्ट्र राज्यातून प्राधान्याने होणारी निर्यात)
◼️ द्राक्ष रु. ३,४६१ कोटी
◼️ डाळिंब निर्यात रु. ४७८ कोटी
◼️ कांदा रु.३९२३ कोटी
◼️ फुले रु. ७१८ कोटी
◼️ आंबा फळे रु. ४९५ कोटी
◼️ हापूस आंबा ७१ कोटी
◼️ केशर आंबा ३९ कोटी
◼️ आंबा पल्प निर्यात रु. ६२५ कोटी
◼️ काकडी घरकीन रु. २,१२७ कोटी
◼️ ताजी फळे रु. ९,४९६ कोटी
◼️ ताजा भाजीपाला रु. ७,३७८ कोटी
◼️ कापूस निर्यात रु. ९,२५० कोटी
◼️ प्रक्रियायुक्त फळे रु. ८,०४८ कोटी
◼️ प्रक्रियायुक्त भाजीपाला रु. ५,४०७ कोटी
◼️ औषधी वनस्पती रु. ५,३९१ कोटी
◼️ देश पातळीवर साखरेची निर्यात रु. २३,३९० कोटी
◼️ काजू रु. २,८०९ कोटी
◼️ तीळ रु. ४,३४७ कोटी
◼️ कारळा रु. ५४ कोटी
◼️ मोलासिस रु. २२,५८२ कोटी
◼️ कडधान्य रु. ५,३३३ कोटी
◼️ गवार गम रु. ४,४९० कोटी
देशात कृषी निर्यातीत बासमती भात रु. ४८,३८९ कोटी, बिगर बासमती भात रु. ३७.८०४ कोटी, म्हशीचे मांस रु. ३१.०१० कोटी या तीन पदार्थांचा वाटा ५६% आहे.
भविष्यातील कृषी नियोजन
१) अद्यावत सांख्यिकीय माहिती कृषी पिके क्षेत्र, उत्पादन, उत्पादकता, जमीन वापर माहिती.
२) वातावरण बदल अनुकूल शेती पद्धती.
३) विकेल ते पिकेल अभियान.
४) बाजार सल्ला नुसार पीक नियोजन.
५) फार्मिंग सिस्टीम अॅप्रोच.
६) गटशेती, समूह शेती, शेतकरी उत्पादक कंपनी.
७) शाश्वत शेती पद्धती.
८) खर्च कमी उत्पादन वाढ करून शेतीची फायदेशीर करणे.
९) मृद व जलसंधारण उपचार पद्धती.
१०) मिश्र पीक पट्टा पीक.
११) आधुनिक मशागत तंत्रज्ञान.
१२) माती तपासणी, संतुलित खत वापर.
१३) बीज प्रक्रिया.
१४) किड नियंत्रण सामूहिक उपाययोजना.
१५) घरचे बियाणे.
१६) जमिनीतील सेंद्रिय कर्ब व आरोग्य व्यवस्थापन: सेंद्रिय कर्ब व जमीन आरोग्यासाठी शेती प्रक्रियेतील टाकाऊ मालापासून कंपोस्ट, जैविक खते कीडनाशके वापरावर भर.
१७) सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर.
१८) कृषी यांत्रिकीकरण.
१९) अद्यावत तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषी माहितीचे व्यवस्थापन.
२०) खते, बियाणे, कीडनाशके, उपलब्धता व गुणवत्ता नियंत्रण.
२१) कृषी मालाची प्रतवारी साठवणूक, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग ऑनलाइन विक्री सुविधा, निर्यात सुविधा.
२२) कृषी वित्त पुरवठा.
२३) कृषी भांडवली गुंतवणूक.
२४) कृषी प्रक्रिया व मूल्यवर्धन.
२५) कृषी शिक्षण व संशोधन.
२६) निर्यातीच्या तिच्या दृष्टीने traceability
२७) नियंत्रित शेती पद्धती चा वापर.
२८) कृषी उत्पादनांचे भौगोलिक मानांकन.
२९) नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, कीडनाशक अंश मुक्त कृषी उत्पादने.
३०) उत्पादक ते ग्राहक अभियान.
३१) करार पद्धतीने शेती.
३२) या सर्व बाबींमध्ये आधुनिक संगणक तंत्रज्ञानचा प्रभावी वापर वर भर.
केवळ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण शेतीतील नव्या सदाहरितक्रांतीची उद्दिष्टे साध्य करून शाश्वत शेती पद्धतीकडे वाटचाल करू शकतो. त्यादृष्टीने ए आय (AI) आधारित राज्याचे नवीन कृषी धोरण आखणी व अंमलबजावणी करण्यात येत आहे.
विनयकुमार आवटे
कृषी संचालक
कृषी प्रक्रिया व नियोजन, कृषी आयुक्तालय, पुणे