Lokmat Agro >शेतशिवार > Agro Advisory : कोरड्या हवामानात अशी घ्या पिकांची काळजी

Agro Advisory : कोरड्या हवामानात अशी घ्या पिकांची काळजी

Agro Advisory: Take care of crops in dry weather like this | Agro Advisory : कोरड्या हवामानात अशी घ्या पिकांची काळजी

Agro Advisory : कोरड्या हवामानात अशी घ्या पिकांची काळजी

Agro Advisory वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी शेती सल्ला दिला आहे तो वाचा सविस्तर

Agro Advisory वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी शेती सल्ला दिला आहे तो वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Agro Advisory :  मागील काही दिवसापासून हवामानात सतत्याने बदल होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानानुसारweatherपिकांचीCrop कशी काळजी घ्यावी यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी शेती सल्ला दिला आहे तो वाचा सविस्तर

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामानWeather कोरडे तर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तर २३  आणि २४ डिसेंबर रोजी बीड, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील तीन दिवसात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

हवामान सारांश / चेतावनी :

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे तर आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. तर २३  आणि २४ डिसेंबर रोजी बीड, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ४ ते ५ दिवस कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही तर किमान तापमानात पुढील दोन दिवसात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर पुढील तीन दिवसात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

सामान्य सल्ला :

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात २६ डिसेंबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व २७ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश : पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.  

पीक व्‍यवस्‍थापन

ऊस: ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस २०% २५ मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल १८.५% ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% ३६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
 

हळद: हळद पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी १५ दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस २५% २० मिली किंवा डायमिथोएट ३० % १५  मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामुळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात जमिनीतून क्लोरोपायरीफॉस ५०% ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन १८.२% + डायफेनकोनॅझोल ११.४% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली + ५ मिली स्टीकरसह प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत.
हरभरा : हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकात घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थानासाठी शेतामध्ये इंग्रजी T आकाराचे प्रति एकर 20 पक्षी थांबे लावावेत व घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. हरभरा पिकात घाटे अळीच्या व्यवस्थानासाठी ५% (एनएसकेई) निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस २५% इसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई: करडई पिकात माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०% १३ मिली किंवा असिफेट ७५% १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

संत्रा/मोसंबी बाग: मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी ००:५२:३४ १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
डाळिंब : काढणीस असलेल्या डाळिंब फळांची काढणी करून घ्यावी.
चिकू : चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

भाजीपाला :

भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन ५% + फेनप्रोपाथ्रीन १५% १० मिली किंवा डायमेथोएट ३०% १३ मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची व गवार पिकावर पावडरी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मायक्लोब्यूटॅनिल १०% डब्ल्यूपी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

फुलशेती :

फुल पिकात खुरपणी करून तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.

 तुती रेशीम उद्योग :

शेडनेट रेशीम किटक संगोपनगृहात स्वच्छता कळीचा मुद्दा आहे. कच्ची जमीन, वाळू, मुरूम असेल तर १०० टक्के निर्जंतुकीकरण होत नाही. जमिनीवर कोबा (सिमेंट, काँक्रेट) किंवा फरशी करून घेणे. शेडनेटच्या आतील चोही बाजूला अर्ध्या फुट खोलीची व एक फुट रूंदीची नाली करून घ्यावी. २% फॉरमॅलीन हात धुण्यासाठी, नायलॉन नेट, कॉटन जाळी, पॉलीथीन अच्छादन यांना निर्जंतूकीकरणासाठी वापरावे.
लोखंडी रॅक असतील तर फॉरमॅलीन फवारू नये रॅकला गंज चढतो तशी शिफारस नाही. जिवाणू, विषाणू व बुरशींच्या प्रादूर्भावामुळे रोग बळावतो त्यामुळे ब्लिचिंग पावडर २ टक्के व ०.३ टक्के चुना द्रावणाने कोष काढणी नंतर शेडनेट गृहात फवारणी करावी.

पशुधन व्यवस्थापन

बदललेल्या हवामानानुसार दूध उत्पादनावरील पशुधन आणि अन्य प्राण्याच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. दुधावरील जनावरांना योग्य प्रमाणात खनिज द्राव्याचे मिश्रण द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी जंतनाशकाची औषधे देण्यात यावी.   थंडीपासुन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास मोकळ्या जागी न बांधता गोठ्यात बांधावेत.

(सौजन्‍य : मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

हे ही वाचा सविस्तर :
Agriculture News : कोबीवर्गीय पिकांसाठी सामान्य सल्ला, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Agro Advisory: Take care of crops in dry weather like this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.