Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > मुक्या जनावरांच्या खाद्यात आढळले किडे, अळ्या; कंपनीकडून मात्र उडवाउडवीचे उत्तरे

मुक्या जनावरांच्या खाद्यात आढळले किडे, अळ्या; कंपनीकडून मात्र उडवाउडवीचे उत्तरे

Worms, larvae found in dumb animal feed; but the company gives vague answers | मुक्या जनावरांच्या खाद्यात आढळले किडे, अळ्या; कंपनीकडून मात्र उडवाउडवीचे उत्तरे

मुक्या जनावरांच्या खाद्यात आढळले किडे, अळ्या; कंपनीकडून मात्र उडवाउडवीचे उत्तरे

खंडेराजुरी (ता. मिरज) येथे एका कंपनीच्या पशुखाद्यामध्ये किडे आणि अळ्या आढळून येत असल्याने निष्पाप जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने संबंधीत पशुखाद्या कंपनीवर तात्काळ कारवाई न केल्यास अखिल भारतीय सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कोळी यांनी दिला आहे.

खंडेराजुरी (ता. मिरज) येथे एका कंपनीच्या पशुखाद्यामध्ये किडे आणि अळ्या आढळून येत असल्याने निष्पाप जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याप्रकरणी प्रशासनाने संबंधीत पशुखाद्या कंपनीवर तात्काळ कारवाई न केल्यास अखिल भारतीय सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कोळी यांनी दिला आहे.

सांगली जिल्ह्याच्या खंडेराजुरी (ता. मिरज) येथे एका कंपनीच्या पशुखाद्यामध्ये किडे आणि अळ्या आढळून येत असल्याने निष्पाप जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद गणपती कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून कंपनीवर कारवाईची मागणी केली आहे.

खंडेराजुरी येथील अखिल भारतीय सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद कोळी यांनी जनावरांसाठी एका कंपनीचे पशुखाद्य खरेदी केले होते. मात्र, हे खाद्य जनावरांना घातल्यानंतर जनावरे आजारी पडली. जेव्हा खाद्याची बारकाईने पाहणी केली असता, त्यात किडे आणि अळ्या असल्याचे वास्तव समोर आले.

खराब पशुखाद्य खाल्ल्यामुळे जनावरे पोट फुगून निपचिप पडल्याने कोळी यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. गणेश यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम जनावरावर उपचार केले.

संबंधित कंपनीच्या खाद्याची पाहणी केली असता अळ्या आढळून येताच पंचनामा करून सदरचे खाद्य जनावरांना खाऊ न घालण्याचा सल्ला दिला. त्यानंतर विनोद कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन याप्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीच्या पशुखाद्याची तपासणी करावी व दोषी आढळल्यास परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली.

न्याय मागायचा कोणाकडे?

विनोद कोळी यांनी या प्रकाराबाबत पशुखाद्य कंपनीला दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, कंपनीने खराब माल परत घेण्यास व नुकसान भरपाई देण्यास साफ नकार दिला.

पशुखाद्या कंपनीच्या बेजबाबदार पणामुळे संतप्त झालेल्या कोळी यांनी पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी तपासणी करणे हे आमचे काम नाही, असे म्हणत हात वर केल्याने न्याय मागायचा कोणाकडे, असा सवालही कोळी यांनी केला आहे.

कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन

याप्रकरणी प्रशासनाने संबंधीत पशुखाद्या कंपनीवर तात्काळ कारवाई न केल्यास अखिल भारतीय सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही कोळी यांनी दिला आहे.

हेही वाचा : अल्पभूधारक बाळासाहेबांच्या जिद्द, कष्टाला आले यश; चार गुंठ्यांच्या पुदिना शेतीतून उत्पन्न पाच लाख

Web Title : पशु आहार में कीड़े पाए गए; कंपनी ने जिम्मेदारी से इनकार किया।

Web Summary : पशु आहार में कीड़े पाए गए, जिससे पशुधन खतरे में है। विनोद कोली ने जानवरों के बीमार पड़ने के बाद अधिकारियों से शिकायत की। कंपनी ने जिम्मेदारी लेने से इनकार कर दिया। कोली ने कार्रवाई न होने पर विरोध प्रदर्शन की धमकी दी।

Web Title : Worms found in animal feed; company denies responsibility.

Web Summary : Animal feed contained worms, endangering livestock. Vinod Koli complained to authorities after animals fell ill. The company refused responsibility. Koli threatens protests if action isn't taken.