कोल्हापूर : दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविणाऱ्या 'गोकुळ'शी संलग्न दूध उत्पादकांसाठी नवीन योजना येत आहे.
आता दुधाळ जनावरांसाठी हवामान (तापमान व पर्जन्यमान) आधारित 'पॅरामेट्रिक विमा योजना' राबविण्यात येणार आहे.
संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी दिली.
हा हवामानातील बदलामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन दूध उत्पादनात घट येते.
हे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या उद्देशाने संघामार्फत विमा कंपन्यांशी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
ही योजना ऐच्छिक असून योजनेबाबतच्या सविस्तर माहितीचे परिपत्रक दूध संस्थांना पाठविल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.
काय आहे योजना◼️ ही योजना एक वर्ष कालावधीची असून, उन्हाळा व पावसाळा या दोन्ही हंगामांचा त्यात समावेश आहे.◼️ उन्हाळ्यात सरासरी तापमान ३२ डिग्रीपेक्षा अधिक व पावसाळ्यात २० ते १४० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास विमा संरक्षण लागू होईल.◼️ निश्चित निकषांनुसार नुकसान झाल्यास प्रतिदिन प्रतिजनावर ५०० रुपये इतकी भरपाई विमा कंपनीमार्फत दिली जाईल.◼️ या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रतिजनावर एक वर्षासाठी २० हजार रुपयांचा विमा उतरविणे बंधनकारक आहे.◼️ वार्षिक २३६ रुपये (२०० रुपये विमा हप्ता, ३६ रुपये जीएसटी) इतका हप्ता आकारण्यात येणार आहे.◼️ दूध उत्पादकांच्या गोठ्यातील जनावरांच्या संख्येनुसार विमा संरक्षण दिले जाईल.
'गोकुळ केसरी' स्पर्धा घेण्याचा निर्णय◼️ काही कारणास्तव मागील काळात बंद पडलेली 'गोकुळ केसरी' कुस्ती स्पर्धा पुन्हा सुरू करण्याबाबत संचालक मंडळात चर्चा झाली.◼️ साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा घेण्याचा मानस अध्यक्ष मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
अधिक वाचा: किलोला मिळतोय तब्बल ७ हजार रुपये दर; 'हा' आहे जगातील सर्वात महागडा खजूर
Web Summary : Gokul introduces weather-based insurance for dairy animals, covering temperature and rainfall risks. The scheme offers ₹500/day compensation if conditions exceed thresholds, with an annual premium of ₹236 per animal. 'Gokul Kesari' wrestling competition will restart.
Web Summary : गोकुल ने दुधारू पशुओं के लिए मौसम आधारित बीमा शुरू किया, जिसमें तापमान और वर्षा जोखिम शामिल हैं। योजना में शर्तों के उल्लंघन पर ₹500/दिन का मुआवजा, ₹236 प्रति पशु का वार्षिक प्रीमियम है। 'गोकुल केसरी' कुश्ती प्रतियोगिता फिर से शुरू होगी।