चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात गाईच्या शेणाची प्रचंड मागणी असून भारताने तब्बल ३०० कोटी रुपयांच्या शेणाची निर्यात केली आहे.
भारत जवळपास दहा देशांना शेणाची निर्यात करीत असून या यादीत अमेरिका दुसऱ्या, तर चीन चौथ्या क्रमांकावर आहे.
भारताने २०२४-२५ मध्ये १२५ कोटी रुपये किमतीच्या ताज्या शेणाची आणि १७३.७ कोटी रुपयांचे शेणखत असे २९८ कोटी ७० लाख रुपयांच्या शेणखताची निर्यात केली आहे.
भारतातून गाईचे शेण आयात करणाऱ्या देशांमध्ये कुवैत, मालदीव, अमेरिका, सिंगापूर, चीन, नेपाळ, ब्राझिल, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, कुवैत, संयुक्त अरब अमिरात आणि न्यूझीलंड या देशांचा समावेश आहे.
यातही कुवैतने सर्वाधिक शेण खरेदी केले आहे. २०२४ मध्ये कुवैतने १९२ मेट्रिक टन शेण खरेदी केले होते. कुवैत गाईच्या शेणाचा वापर खजूरचे उत्पादन करण्यासाठी करीत आहे.
दिवसाला मिळते ३० लाख टन शेण
◼️ नीती आयोगानुसार, भारतात ३० कोटी गाई असून त्यांच्यापासून एका दिवसात ३० लाख टन शेण मिळते.
◼️ यात पहिल्या क्रमांकावर राजस्थान आहे.
◼️ यानंतर उत्तर प्रदेश व महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
◼️ भारतातील १८१ व्यावसायिकांनी जगभरातील ३२७खरेदीदारांना शेणाची निर्यात केली आहे.
◼️ जर्मनीचे राजदूत डॉ. फिलिए एकरमॅन यांनी अलीकडेच गोमूत्र आणि शेणाला 'डिप्लोमॅटिक टूल' म्हटले आहे.
◼️ शेण आणि गोमूत्रापासून जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी जर्मन विकास बँकेने आंध्रप्रदेशातील महिलांना आर्थिक साहाय्य दिले आहे.
अधिक वाचा: इंजिनिअरचे १४ लाखांचे पॅकेज सोडून धनराज पाटलांनी सुरु केले पशुपालन; मिळविले १ तोळे सोन्याचे बक्षीस
