Join us
Daily Top 2Weekly Top 5

मागीलवर्षी पुरामुळे नुकसान झालेल्या पशुपालकांच्या भरपाईचा मार्ग मोकळा; किती अन् कशी मिळणार मदत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 15:31 IST

pashupalan madat package महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन यांनी बाधित पशुपालकांसाठी सविस्तर मदत पॅकेज जाहीर केले आहे.

महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन यांनी बाधित पशुपालकांसाठी सविस्तर मदत पॅकेज जाहीर केले आहे.

राज्यात माहे जून ते सप्टेबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief package) व सवलती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय आला आहे.

मदतीचे दर (प्रति जनावर)
◼️ दुभती जनावरे : ₹ ३७,५००
◼️ ओढकाम करणारी जनावरे : ₹ ३२,०००
◼️ लहान जनावरे : ₹ २०,०००
◼️ शेळी/मेंढी : ₹ ४,०००
◼️ कुक्कुटपालन : प्रति कोंबडी ₹ १००
◼️ गोठा नुकसान : प्रति गोठा ₹ ३,०००

पात्रता व सवलती
◼️ पूर्वीच्या मर्यादा शिथिल करून सर्व बाधित पशुपालकांना मदतीसाठी पात्र ठरवले आहे.
◼️ मृत किंवा बेपत्ता झालेली सर्व जनावरे मदतीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.
◼️ कुक्कुटपालनासाठी पूर्वीची मर्यादा वाढवून सर्व पक्षी मदतीत समाविष्ट.

आवश्यक नोंदी
मदत मिळण्यासाठी पशुधनाची खालीलपैकी कोणत्याही नोंदीत नोंद असणे आवश्यक
◼️ NDLM (डिजिटल पशुधन अ‍ॅप)
◼️ २१वी पशुगणना.
◼️ लसीकरण नोंदवही.
◼️ विमा कंपनी नोंद.
◼️ दुग्ध अनुदान योजना नोंद.

पंचनामा प्रक्रिया
◼️ पशुधन मृत्यू किंवा बेपत्ता झाल्यास पंचनामा अनिवार्य.
◼️ पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील/सरपंच यांच्या उपस्थितीत पंचनामा.
◼️ मृत जनावरांसाठी शवविच्छेदन अहवाल आवश्यक.

मदत वितरण प्रक्रिया
◼️ तलाठी मार्फत अहवाल तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.
◼️ जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मदत वितरित.
◼️ विमा भरपाई मिळाल्यास शासन मदत मिळणार नाही.

महत्वाच्या सूचना
◼️ आधार व बँक खाते तपशील आवश्यक.
◼️ मृत/बेपत्ता पशुधनाची ओळख निश्चित करणे बंधनकारक.
◼️ मदत राष्ट्रीय व राज्य आपत्ती निवारण निधीतून दिली जाणार.

अधिक वाचा: शेतरस्त्यावर अतिक्रमण किंवा शेतरस्ता आडवणे पडणार महागात; होणार आता 'ही' शिक्षा

English
हिंदी सारांश
Web Title : बाढ़ से हुए पशुधन के नुकसान के लिए महाराष्ट्र सरकार का मुआवजा

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने 2025 में बाढ़ से प्रभावित पशुधन किसानों को मुआवजा देने की घोषणा की है। डेयरी पशुओं के लिए ₹37,500, भार ढोने वाले पशुओं के लिए ₹32,000 और भेड़/बकरियों के लिए ₹4,000 का मुआवजा शामिल है। NDLM या पशुधन जनगणना में पंजीकरण आवश्यक है। सत्यापन के बाद जिला कलेक्टरों के माध्यम से भुगतान किया जाएगा।
टॅग्स :शेतकरीपूरराज्य सरकारसरकारदुग्धव्यवसायगायशेळीपालनशासन निर्णयपोल्ट्रीपाऊसजिल्हाधिकारीतहसीलदारसरपंचपोलिस