महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन यांनी बाधित पशुपालकांसाठी सविस्तर मदत पॅकेज जाहीर केले आहे.
राज्यात माहे जून ते सप्टेबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज (Relief package) व सवलती देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय आला आहे.
मदतीचे दर (प्रति जनावर)◼️ दुभती जनावरे : ₹ ३७,५००◼️ ओढकाम करणारी जनावरे : ₹ ३२,०००◼️ लहान जनावरे : ₹ २०,०००◼️ शेळी/मेंढी : ₹ ४,०००◼️ कुक्कुटपालन : प्रति कोंबडी ₹ १००◼️ गोठा नुकसान : प्रति गोठा ₹ ३,०००
पात्रता व सवलती◼️ पूर्वीच्या मर्यादा शिथिल करून सर्व बाधित पशुपालकांना मदतीसाठी पात्र ठरवले आहे.◼️ मृत किंवा बेपत्ता झालेली सर्व जनावरे मदतीसाठी ग्राह्य धरली जाणार आहेत.◼️ कुक्कुटपालनासाठी पूर्वीची मर्यादा वाढवून सर्व पक्षी मदतीत समाविष्ट.
आवश्यक नोंदीमदत मिळण्यासाठी पशुधनाची खालीलपैकी कोणत्याही नोंदीत नोंद असणे आवश्यक◼️ NDLM (डिजिटल पशुधन अॅप)◼️ २१वी पशुगणना.◼️ लसीकरण नोंदवही.◼️ विमा कंपनी नोंद.◼️ दुग्ध अनुदान योजना नोंद.
पंचनामा प्रक्रिया◼️ पशुधन मृत्यू किंवा बेपत्ता झाल्यास पंचनामा अनिवार्य.◼️ पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील/सरपंच यांच्या उपस्थितीत पंचनामा.◼️ मृत जनावरांसाठी शवविच्छेदन अहवाल आवश्यक.
मदत वितरण प्रक्रिया◼️ तलाठी मार्फत अहवाल तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर.◼️ जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मदत वितरित.◼️ विमा भरपाई मिळाल्यास शासन मदत मिळणार नाही.
महत्वाच्या सूचना◼️ आधार व बँक खाते तपशील आवश्यक.◼️ मृत/बेपत्ता पशुधनाची ओळख निश्चित करणे बंधनकारक.◼️ मदत राष्ट्रीय व राज्य आपत्ती निवारण निधीतून दिली जाणार.
अधिक वाचा: शेतरस्त्यावर अतिक्रमण किंवा शेतरस्ता आडवणे पडणार महागात; होणार आता 'ही' शिक्षा
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने 2025 में बाढ़ से प्रभावित पशुधन किसानों को मुआवजा देने की घोषणा की है। डेयरी पशुओं के लिए ₹37,500, भार ढोने वाले पशुओं के लिए ₹32,000 और भेड़/बकरियों के लिए ₹4,000 का मुआवजा शामिल है। NDLM या पशुधन जनगणना में पंजीकरण आवश्यक है। सत्यापन के बाद जिला कलेक्टरों के माध्यम से भुगतान किया जाएगा।
Web Summary : महाराष्ट्र सरकार ने 2025 में बाढ़ से प्रभावित पशुधन किसानों को मुआवजा देने की घोषणा की है। डेयरी पशुओं के लिए ₹37,500, भार ढोने वाले पशुओं के लिए ₹32,000 और भेड़/बकरियों के लिए ₹4,000 का मुआवजा शामिल है। NDLM या पशुधन जनगणना में पंजीकरण आवश्यक है। सत्यापन के बाद जिला कलेक्टरों के माध्यम से भुगतान किया जाएगा।