करकंब : सुवासिनीचे कोडकौतक करून डोहाळजेवण साजरे केले जाते हे सर्वांनाच माहिती आहे. पण इथे गाईला नववा महिना लागला असून तिचे डोहाळजेवण घालण्यात आले आहे.
मात्र, पंढरपूर तालुक्यातील नेमतवाडीत मंडप व स्पीकर लावून, गाणी गाऊन विधिवत पूजा करून, महिलांकडून खणानारळाने गोमातेचे (गायीचे) ओटी भरून डोहाळजेवण घातले गेले. गोदावरी तिचे नाव. गोसावी परिवाराने गोमातेप्रती ही आपुलकी दाखवली.
येथील माजी सरपंच पूनम गोसावी व शंकर गोसावी यांना नांदोरे येथील लक्ष्मण वाघ यांनी २०२३ साली अधिक महिन्यात सहा महिने वयाच्या गोमातेचे दान दिले होते.
त्यांनी त्या गायीचे गोदावरी नाव ठेवले होते. मुलांप्रमाणे तिचा सांभाळ केला जातोय. गोदावरीला नववा महिना लागला असून तिचे डोहाळजेवण घालण्याची कल्पना पूनम गोसावी यांना सुचली.
हिंदू संस्कृतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गोमातेचे डोहाळजेवण आला. कार्यक्रमासाठी वस्त्र, हार, फुले, कार्यक्रमासाठी मंडप व स्पीकर लावण्यात फळे, फराळ आदी वस्तू आणल्या.
या कार्यक्रमासाठी इस्लामपूर कृषी अधिकारी नीलेश गोसावी, शंकर गोसावी, स्वप्नाली गोसावी, प्रियांका गोसावी, नंदा पवार, किसाबाई खुळे, सुरेखा आजबे, प्रतिज्ञा माने, शोभा भालेराव, राधाबाई खुळे, छाया जगताप, अनिता कदम, शोभा खुळे, वनिता भोसले, मंदा खुळे आदी महिला उपस्थित होत्या.
मंडप उभारून विधिवत पूजेने सन्मान
◼️ या अनोख्या उपक्रमासाठी मंडप, स्पिकर लावून गावातील महिलांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले.
◼️ उपस्थित महिलांनी गोदावरीची विधिवत पूजा केली. गाणी गाऊन तिची खणानारळाने ओटी भरली.
◼️ विविध प्रकारचे खाद्य चारून तिचा सन्मान केला. विशेष म्हणजे कार्यक्रम होईपर्यंत गोदावरीने शांत राहून सहकार्य केले.
गोमाता मानली जाते. 'त्या' गोमातेचे पालन पोषण करणे व आपल्या घरातील एक बहीण म्हणून तिच्याकडे पाहणे व तिचे सर्व कर्तव्य पार पाडणे हे माणुसकीचे अतूट कर्तव्य म्हणून डोहाळ जेवण घातले. - पूनम गोसावी, माजी सरपंच, नेमतवाडी
अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलला; नवीन रेखांकनात जिल्ह्यातील 'या' गावांचा समावेश होणार
