lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

So many milk producers in Kolhapur district will be deprived of subsidy | कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

कोल्हापूर जिल्ह्यात एवढे दूध उत्पादक राहणार अनुदानापासून वंचित

मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राजाराम लोंढे
कोल्हापूर : गायदूध अनुदानापासून जिल्ह्यातील सुमारे ५१ हजार १३३ शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत. पहिल्या दहा दिवसात (११ ते २० जानेवारी) ४० हजार शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे.

दहा दिवसात ६ कोटी अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, २ कोटी ५९ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. जाचक अटी आणि तांत्रिक अडचणीमुळे पात्र शेतकरी अपात्र ठरणार आहेत. 

गाय दुधाचे दर कमी झाल्याने राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना दोन महिन्यासाठी (११ जानेवारी ते १० मार्च २०२४ अखेर) प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार निकष देऊन उत्पादकांसह पशुधनाची माहीती ऑनलाइन भरण्याची सूचना दिली. जिल्ह्यात 'गोकुळ'चे ८१ हजार दुध उत्पादक आहेत. मात्र, माहिती भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नाही. काहींनी मराठीतच माहीती भरल्याने तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरले आहेत.

आतापर्यंत 'गोकुळ', 'वारणा', 'वैजनाथ' संघांच्या २४ हजार ५९० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ५१ लाख रुपये जमा झाले. आता १ कोटी १ लाख ५२ हजार वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात ९१ हजार ६०१ गाय दूध उत्पादक शेतकरी आहेत. त्यापैकी ४० हजार ४६६ शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. उर्वरित ५१ हजार जण वंचित राहण्याची शक्यता आहे.

यामुळे अनुदानापासून राहावे लागले वंचित
• दूध उत्पादकांचा कॅशलेस व्यवहार नाही
• पशुधन अॅपवर नोंदणी नाही. माहिती मराठीत भरली आहे.
• पती-पत्नींसाठी एकच बँक खाते क्रमांक
• एकाच उत्पादकाचे दोन संस्थेत दूध
• मोबाइल आणि आधार कार्ड क्रमांक चुकीचा

सोमवारपर्यंत माहिती भरण्याची मुदत
आता पहिल्या दहा दिवसांची माहिती भरण्यात आलेली आहे; पण मार्चअखेर अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेच लागणार आहेत. त्यामुळे दोन महिन्यांची माहिती भरण्यासाठी सोमवार (दि. २५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

दुग्ध विभागाच्या प्रयत्नामुळेच सर्वाधिक अनुदान दुग्ध विभाग व गोकुळ दूध संघाच्या यंत्रणेमुळे राज्यात सर्वाधिक अनुदान कोल्हापुरात मिळाले आहे. दुग्ध विभागात अपुरी कर्मचारी संख्या असतानाही त्यांनी युद्ध पातळीवर काम केल्यानेच हे शक्य झाले.

जिल्ह्यात हे आहेत दूध संघ व त्यांचे गाय दूध उत्पादक
गोकुळ ८१ हजार
वारणा ८०१७
स्वाभिमानी ६३४
श्री दत्त इंडिया ४१९
छत्रपती शाहू १६२
विमल डेअरी १०९
हॅपी इंडिया १०१
स्वामी समर्थ ९१
चौगुले मिल्क २१
वैजनाथ मिल्क १०

Web Title: So many milk producers in Kolhapur district will be deprived of subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.