राजाराम लोंढे
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) वतीने प्राथमिक दूध संस्थांशी सलग्न दूध उत्पादक महिला सभासदांसाठी 'नारी सन्मान विमा योजना' सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
दीडशे रुपयांत दोन लाखांची जोखीम राहणार असून, अवयव गमावणे यासह आग, वीज पडणे, दंगली, पूर, चक्रीवादळ आदींमुळे घरगुती वस्तूंच्या झालेल्या नुकसानभरपाईपोटी पाच हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे.
दूध उत्पादक महिलांच्या सुरक्षितेबाबत गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यांच्या नावे व्यक्तिगत विमाही नसल्याने अपघातानंतर कुटुंब उघड्यावर पडते. यासाठी 'गोकुळ' तर्फे ही योजना सुरू करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.
यासाठी वार्षिक १५० रुपये विमा हप्ता असून, यात ७० टक्के (१०५ रुपये) संबंधित महिला तर ३० टक्के (४५ रुपये) हे संघ भरणार असल्याचे समजते.
अशी मिळू शकते भरपाई
जोखीम - भरपाई
◼️ अपघाती मृत्यू - २ लाख
◼️ कायमचे पूर्ण अपंगत्व - २ लाख
◼️ एका डोळ्यातील दृष्टी गमावणे - १ लाख
◼️ उपजीविका संरक्षण अनुदान - २५ ते ५० हजार
◼️ १८ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी शैक्षणिक अनुदान - प्रती बालक ५ हजार
बिहार, यूपी, राजस्थानातील मुऱ्हा म्हशींच्या अनुदानात कपात
◼️ 'गोकुळ' दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'मुऱ्हा' म्हैस खरेदीसाठी ५० हजार रुपये अनुदान देते.
◼️ काही शेतकरी बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान येथून क्रॉस मुऱ्हा म्हशींची खरेदी करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
◼️ येथून आणलेल्या म्हशींच्या अनुदानात वीस हजार रुपयांची कपात केली असून, ३० हजार रुपये दिले जातील.
◼️ यात वाहतूक खर्च ५ हजार, गोठ्यात म्हैस गाभण जाऊन व्याल्यानंतर १० हजार तर तिसरे वर्ष पूर्ण झाल्यानंतर उर्वरित १५ हजार रुपये अनुदान दान दिले जाणार आहे.
अधिक वाचा: आता लाईट कनेक्शन मिळणार झटपट; ग्रामीण भागात किती दिवसांत मिळणार नवीन कनेक्शन?
