Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > दुधाच्या दरात उसळी; पावडर, बटर व तुपाचे काय सुरु आहेत दर? वाचा सविस्तर

दुधाच्या दरात उसळी; पावडर, बटर व तुपाचे काय सुरु आहेत दर? वाचा सविस्तर

Milk prices jump; What are the prices of powder, butter and ghee? Read in detail | दुधाच्या दरात उसळी; पावडर, बटर व तुपाचे काय सुरु आहेत दर? वाचा सविस्तर

दुधाच्या दरात उसळी; पावडर, बटर व तुपाचे काय सुरु आहेत दर? वाचा सविस्तर

milk rate जागतिक अस्थिरतेबरोबरच पावडरचे केलेले स्टॉक सध्या बाहेर काढल्याने अपेक्षित दरवाढ होताना दिसत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

milk rate जागतिक अस्थिरतेबरोबरच पावडरचे केलेले स्टॉक सध्या बाहेर काढल्याने अपेक्षित दरवाढ होताना दिसत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राजाराम लोंढे
कोल्हापूर : कडक उन्हाळ्यामुळे दर एकीकडे दुधाच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने दुधाचे दर वाढू लागले आहेत. मात्र, गायदूध पावडरच्या दरात अपेक्षित वाढ दिसत नसून मार्च महिन्याच्या तुलनेत प्रतिकिलो दहा ते पंधरा रुपयांनी कमी आहेत.

जागतिक अस्थिरतेबरोबरच पावडरचे केलेले स्टॉक सध्या बाहेर काढल्याने अपेक्षित दरवाढ होताना दिसत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या सरासरी ३०० किलो प्रतिकिलो दर आहे. त्या तुलनेत बटर मात्र काहीसे तेजीत दिसत असून ५०० ते ५१० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे.

यंदा फेब्रुवारीपासून उन्हाच्या झळा अनुभवयास आल्या, आता तापमानात मोठी वाढ झाल्याने दूध उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.

ओल्या चाऱ्यासह अनेक ठिकाणी जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यात, कडक उन्हामुळे दही, ताक, लस्सीसह इतर दुग्ध पदार्थाची मागणी वाढली आणि दुधाचे उत्पादन घटल्याने टंचाई भासत आहे.

राज्यातील सर्वच दूध संघांनी विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली. एकीकडे दुधाने उसळी घेतली; पण त्या पटीत दूध पावडरच्या दरात वाढ होताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही पावडरचे दर स्थिर आहेत. त्यात, जागतिक अस्थिरतेचा परिणामही दरावर दिसत आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत प्रतिकिलो १५ ते २० रुपयांनी दर अधिक असले तरी गेल्या दोन महिन्यांत दहा रुपयांनी दर कमी झाले आहेत. याउलट बटरला चांगलीच तेजी आहे. गाय बटरचा दर ५०० ते ५१० रुपयांपर्यंत पोहोचला आहे

२ महिने दुधाचे उत्पादन कमीच
मान्सून सक्रिय झाल्यानंतर दक्षिणेकडील राज्यात गाय दुधाचे उत्पादन हळूहळू वाढू लागते. मात्र, आपल्याकडे म्हैस दूध सप्टेंबरनंतरच वाढण्यास सुरुवात होते.

पावडर, बटर दरवाढीची कारणे
◼️ चारा, इंधन आणि पॅकेजिंग साहित्याच्या दरात वाढ.
◼️ बिहार आणि पश्चिम बंगालसह इतर भागांतून दूध पावडरची मागणी चांगली आहे.
◼️ मागील हंगामात अपेक्षेपेक्षा कमी दूध उत्पादन झाल्याने बटर व पावडरचे दर चढे राहिले आहेत.

असे आहेत बाजारातील दर
◼️ गाय दूध पावडर - २५० ते ३५० प्रतिकिलो
◼️ बटर - ५०० ते ५१० प्रतिकिलो
◼️ तूप - ६२२ रुपये प्रतिकिलो

अधिक वाचा: महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरताय? मग अवघ्या ५ हजारांतच मिळणार सोलर सिस्टीम

Web Title : दूध की कीमतों में उछाल; पाउडर, मक्खन, घी के दर क्या हैं?

Web Summary : गर्मी की लहरों के बीच उत्पादन घटने से दूध की कीमतें बढ़ रही हैं। दूध पाउडर की कीमतें अपेक्षा से कम हैं, लेकिन मक्खन की कीमतें बढ़ गई हैं। घी स्थिर है। मौसम और बाजार कारकों के कारण डेयरी उत्पादों की कीमतें बदल रही हैं।

Web Title : Milk prices surge; what about powder, butter, ghee rates?

Web Summary : Milk prices are rising due to reduced production amid heatwaves. While milk powder prices remain lower than expected, butter prices are up. Ghee is stable. Overall, dairy product prices are fluctuating due to weather and market factors.