Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार

पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार

Good news for veterinarians with degrees; 3,000 veterinarian positions to be filled soon | पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार

पदवीधारक पशुवैद्यकांसाठी आनंदाची बातमी; लवकरच ३ हजार पशुवैद्यकांची पदे भरणार

राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही.

राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही.

शेअर :

Join us
Join usNext

राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींनुसार ५००० प्राण्यांमागे एक पशुवैद्यक असणे आवश्यक असून सध्या राज्यात ३ कोटी ३० लाख पशुधन असून, या सेवांसाठी पुरेसे पशुवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही.

या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय शिक्षण आणि पशुसंवर्धन सेवांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला असून लवकरच ३००० पशुवैद्यकांची पदे भरण्यात येत असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेच्या लक्षवेधी उत्तरामध्ये दिली.

सध्या अकोला, सांगली, बारामती आणि परभणी येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये मंजूर करण्यात आली आहेत. शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शुल्कवाढ होणार नाही.

तसेच, खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही शुल्क नियमन प्राधिकरणामार्फत शुल्क निश्चित केले जाणार आहे. शासनाने खासगी महाविद्यालयांना परवानगी देताना कठोर निकष ठेवले असल्याचेही पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या.

पशुवैद्यकीय सेवा मजबुतीकरणासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून शासनाने श्रेणी-१ पशू रुग्णालयांमध्ये पदवीधारक पशुवैद्यक असणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यात ३००० हून अधिक पशुवैद्यकांची आवश्यकता भासणार आहे.

पशुवैद्यकीय परिषद अधिनियमाच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे पशुधनासाठी अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार असल्याचे मुंडे यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा: Dudh Anudan : राज्य सरकारची दूध अनुदान योजना चालू की बंद? उरलेलं अनुदान मिळणार का?

Web Title: Good news for veterinarians with degrees; 3,000 veterinarian positions to be filled soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.